भारत बंदला संगमनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद
By | Updated: December 9, 2020 04:15 IST2020-12-09T04:15:50+5:302020-12-09T04:15:50+5:30
राष्ट्र सेवा दल, समाजवादी जनपरिषद, छात्रभारती विद्यार्थी संघटना, एकता सामाजिक सेवाभावी संघटना, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा आदी संघटनांच्या ...

भारत बंदला संगमनेरात उत्स्फूर्त प्रतिसाद
राष्ट्र सेवा दल, समाजवादी जनपरिषद, छात्रभारती विद्यार्थी संघटना, एकता सामाजिक सेवाभावी संघटना, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा आदी संघटनांच्या वतीने नवीन नगर रस्ता येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर केंद्रीय कृषी व कामगार विधेयकांना विरोध करत आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राष्ट्र सेवा दलाचे माजी कार्याध्यक्ष राजाभाऊ अवसक, अंगणवाडी कर्मचारी सभेच्या प्रदेशाध्यक्षा अॅड. निशा शिवूरकर, छात्रभारती संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत घुले, माजी सचिव रजत अवसक, एकता सामाजिक सेवाभावी संघटनेचे अध्यक्ष आसिफ शेख, छात्रभारती संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष तुषार पानसरे, संगमनेर तालुका अंगणवाडी कर्मचारी सभेच्या अध्यक्षा भारती धरत, समाजवादी जनपरिषदेचे संगमनेर शहराध्यक्ष बाबूराव गायकवाड, तालुका सरचिटणिस शांताराम गोसावी, प्रा. शिवाजीराव गायकवाड, अब्दुला हुसन चौधरी, अॅड. ज्ञानदेव सहाणे, ज्ञानेश्वर राक्षे, अनिल गुंजाळ, तृप्ती जोर्वेकर, दीपाली कदारे, प्रतीक्षा डाफसे, संदीप आखाडे, स्वप्नील मानव, अश्विन गायकवाड आदींनी या आंदोलनात सहभाग घेतला.
-------------
राष्ट्रीय दलित पँथरच्या वतीने मोर्चा केंद्रीय व कृषी कामगार विधेयकांना विरोध करण्यासाठी संगमनेर शहरात मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात जिल्हाध्यक्ष सोमनाथ भालेराव, जिल्हा संघटक प्रवीण गायकवाड, युवक जिल्हाध्यक्ष आकाश गोडगे, संगमनेर शहराध्यक्ष राजू यादव, मंजाबापू साळवे, सम्राट पेटकर, संदीप दळवी, राम दरोळे, रवींद्र गिरी आदी सहभागी झाले होते.
___
फोटो नेम : ०८संगमनेर आंदोलन
ओळ : केंद्रीय कृषी व कामगार विधेयकांना विरोध करत संगमनेरात आंदोलन करण्यात आले.