दक्षिण जिल्ह्याच्या दूध संकलनात वाढ

By Admin | Updated: June 16, 2014 00:11 IST2014-06-15T23:43:58+5:302014-06-16T00:11:06+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या दुधाच्या संकलनात गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ८२ हजार लीटरने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात संगमनेर आणि कोपरगाव

South district's milk collection increases | दक्षिण जिल्ह्याच्या दूध संकलनात वाढ

दक्षिण जिल्ह्याच्या दूध संकलनात वाढ

अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात झालेल्या दुधाच्या संकलनात गतवर्षीच्या तुलनेत २ लाख ८२ हजार लीटरने वाढ झाली आहे. विशेष म्हणजे यात संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यात मात्र, दुधाचे संकलन घटलेले आहे. तर दक्षिण जिल्ह्यात सर्व तालुक्यात दुधाच्या संकलनात वाढ झालेली दिसत आहे.
जिल्हा दूधव्यवसाय अधिकारी यांच्या कार्यालयाकडील माहितीनुसार जिल्ह्यात गत वर्षी मे महिन्याच्या तुलनेत यंदा दूध संकलनात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी मे महिन्यात जिल्ह्यात २० लाख २३ हजार ८८७ लीटर दुधाचे संकलन झाले होते. यंदा त्यात वाढ होऊन २३ लाख ६ हजार ५८० लीटरपर्यंत दुधाचे संकलन झालेले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक दुधाचे उत्पादन असणाऱ्या संगमनेर आणि कोपरगाव तालुका वगळता अन्यत्र भरघोस वाढ दिसत आहे. यात सर्वाधिक वाढ राहुरी तालुक्यात ५० हजार लीटरहून अधिक झालेली आहे. तर श्रीगोंदा ४९ हजार लीटर, पारनेर ४८ हजार लीटर, पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यातून ४७ हजार लीटर, कर्जत ४४ हजार आणि नेवासा ३२ हजार लीटर असे दुधाचे संकलन झालेले आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती होती. त्याकाळात सर्वाधिक पाण्याचे टँकर जिल्ह्यात सुरू होते. हिरव्या चाऱ्या सोबतच सुक्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झालेला होता. याचा फटका दूध व्यवसायाला बसला आणि दुधाच्या उत्पादनात घट आली होती. विशेष म्हणजे या काळातही संगमनेर आणि कोपरगाव तालुक्यातील दुधाचे उत्पादन घटले नव्हते. यंदा उन्हाळ्यात बऱ्यापैकी चारा उपलब्ध होता. खरीप आणि रब्बी हंगामात मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध झाल्याने दूध उत्पादन टिकून राहिले. (प्रतिनिधी)

तालुकानिहाय दुधाचे संकलन लीटरमध्ये ( गतवर्षीचे)
अकोले १ लाख ९ हजार ५६३ (१ लाख ९ हजार ६१६), संगमनेर ३ लाख ८१ हजार (४ लाख ४९ हजार ३५६), कोपरगाव १ लाख ४१ हजार ४५३ ( १ लाख २१ हजार ८२), राहाता २ लाख ५८ हजार २०५ ( २ लाख ३३ हजार २०२), श्रीरामपूर १ लाख १९ हजार १४९ (९२ हजार २४७), नेवासा १ लाख ३० हजार ५०० (९८ हजार २४५), शेवगाव ३१ हजार ५०० ( २२ हजार ९००), पाथर्डी ९६ हजार ७२७ (४८ हजार ७८४), नगर १ लाख ५७ हजार ५४८ ( १ लाख ७९ हजार २१८), राहुरी ३ लाख १९ हजार १९६ (२ लाख ६५ हजार १९५), पारनेर २ लाख ४२ हजार १५४ (१ लाख ९३ हजार ३५८), श्रीगोंदा १ लाख ६७ हजार १९५ (१ लाख १७ हजार ७७४), कर्जत १ लाख २७ हजार ७०० (८३ हजार १००), जामखेड २२ हजार ८०० (१० हजार ४५०) असा आहे.

Web Title: South district's milk collection increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.