कर्णकर्कश हॉन अन् सायलेंसरच्या आवाजाचा दणदणाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:58+5:302021-02-21T04:39:58+5:30

अहमदनगर : वाहनांचे कर्णकर्कश म्युझिकल हॉर्न अन् बुलेटसासरख्या बाईकच्या सायलेंसरमधून निघणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने नगरकरांच्या कानठिळ्या बसत आहेत. बाईक फॅशनच्या ...

The sound of a hoarse hoarse silencer | कर्णकर्कश हॉन अन् सायलेंसरच्या आवाजाचा दणदणाट

कर्णकर्कश हॉन अन् सायलेंसरच्या आवाजाचा दणदणाट

अहमदनगर : वाहनांचे कर्णकर्कश म्युझिकल हॉर्न अन् बुलेटसासरख्या बाईकच्या

सायलेंसरमधून निघणाऱ्या फटाक्यांच्या आवाजाने नगरकरांच्या कानठिळ्या बसत

आहेत. बाईक फॅशनच्या नावाखाली सुरू असलेला हा दणदणाट सध्या सर्वांसाठीच

त्रासदायक ठरताना दिसत आहे.

ध्वनीप्रदूषण करीत सुसाट पळणाऱ्या अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून

दंडात्मक कारवाई होत असली तरी म्युझिकल हॉर्न आणि जास्त आवाजाचे हॉर्न

बसविण्याचे फॅड काही कमी होताना दिसत नाही. लॉकडाऊनकाळात रस्त्यावर वाहने

आणण्यास बंदी होती. त्यामुळे ध्वनीप्रदूषण कमी झाले होते. अनलॉक होताच

पुन्हा त्रासदायक आवाजांचा गोंगाट सुरू झाल्याचे दिसत आहेत. फॅफ हॉर्न

आणि तांत्रिक बदल करून बाईकला मोठ्या आवाजाचे सायलेंसर बसविण्याची

तरुणांमध्ये सर्वाधिक फॅड आहे. हसे हॉर्न, सायलेंसर विक्रेत्यांवर कारवाई

होणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांमधून व्यक्त हाेत आहे.

-------------------------------------

दोन किलोमीटर अंतरावर ऐकू येते फायरिंग

बुलेटसारख्या बाईकमध्ये तांत्रिक बदल करून कर्कश आवाजाचे सायलेंसर बसविले

जातात. शहरातून अशा बाईक आवाज करीत धावतात तेव्हा भूकंप झाल्याचा भास होतो.

लहान मुले घाबरू जातात. किमान एक ते दोन किलोमीटर अंतरावर या बाईकच्या

फायरिंगचा आवाज ऐकायला येतो.

-----------------------------

मोठ्या वाहनांचे हॉर्नही धडकी भरविणारे

कार, ट्रक, जीप यासह विविध मोठ्या वाहनांनाही हौशीबहाद्दर म्युझिकल हॉर्न

बसवितात. गर्दीच्या ठिकाणी अचानक असे हॉर्न वाजविले तर काळजात धडकी भरते.

या गोंगाटाचे ध्वनीप्रदूषण मोजण्याची सध्या कोणतीच यंत्रणा कार्यान्वित

नसल्याचे दिसत आहे.

-------------------------------------

वर्षभरात केवळ ४ कारवाई

म्युझिकल हॉर्न व विनाकारण हॉर्न वाजविला तर वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकाला ५०० रुपयांचा दंड केल जातो. जिल्ह्यात मागील वर्षभरात म्युझिक हॉर्नबाबत केवळ चार कारवाया झाल्याची नोंद आहे. पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने असा आवाज करणाऱ्यांना मोकळे रान मिळत आहे.

-------------------------------------------

म्युझिकल हॉर्न वाजविणाऱ्यांवर येणाऱ्या काळात कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच मोटारसायकलला तांत्रिक बदल करून आवाजाचा सायलेंसर बसविणाऱ्यांवर कारवाई करून उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे संबंधित वाहनाचा अहवाल पाठविला जाईल.

-विकास देवरे, वाहतूक निरिक्षक, अहमदनगर शहर

फोटो २० हार्न १,२,३,

Web Title: The sound of a hoarse hoarse silencer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.