साईबाबांच्या गुरूस्थान मंदिराचे लवकरच पुनर्निर्माण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:15 IST2021-07-19T04:15:01+5:302021-07-19T04:15:01+5:30
सध्याचे मंदिर १५ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेले आहे़ ते लहान असल्याने उंबऱ्याच्या बाहेर बसून पूजा करावी लागते. मंदिर ...

साईबाबांच्या गुरूस्थान मंदिराचे लवकरच पुनर्निर्माण
सध्याचे मंदिर १५ वर्षांपूर्वी बनविण्यात आलेले आहे़ ते लहान असल्याने उंबऱ्याच्या बाहेर बसून पूजा करावी लागते. मंदिर लहान असल्याने शिवलिंग व साईबाबांच्या प्रतिमेवर ऊन, वारा, पाऊस थेट पोहचतो. यामुळे मंदिराला मंडप करावा लागतो. या पार्श्वभूमीवर मंदिराचे पुनर्निर्माण करावे, अशी आग्रही मागणी सर्वपक्षीय शिर्डी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती.
शिर्डीतील साईसमाधी असलेला बुटीवाडा, गुरूस्थान मंदिर, चावडी मंदिर, दीक्षित वाडा, द्वारकामाई मंदिर अशी सर्वच बांधकामे भाविकांच्या पुढाकारातून झालेली आहेत़
समाधी मंदिराला शोभेल असे दगडी व प्राचीन ओळख दर्शवणारे हे मंदिर असावे, अशी शिर्डीकराची इच्छा आहे. याशिवाय साईमंदिरातील स्टीलचे रेलिंग काढून तेथे सिसम किंवा सागवानी लाकडाचे आकर्षक नक्षीदार रेलिंग बनविण्यासाठीही साईसंस्थानकडून प्रयत्न सुरू आहे.
................
येत्या काही महिन्यात हे मंदिर बांधण्याचा संकल्प आहे़ हे मंदिर बारा बाय बारा फूट क्षेत्रफळाचे असेल. यासाठी संस्थानचा एकही रुपया खर्च होणार नाही. अनेक भाविक मंदिर उभारणीसाठी पुढे आले आहेत. ग्रामस्थांनी निधी दिला तरी आनंदच आहे़ हे मंदिर ब्लॅक ग्रॅनाईटमध्ये असेल. आराखडा सुप्रसिद्ध मंदिर आर्किटेक्ट बालन टी़ एन. यांनी काढला आहे़
- कान्हुराज बगाटे, सीईओ, साई संस्थान