शनिवारी त्यांनी अकोले तालुक्यातील कोविड सेंटर व ग्रामीण रुग्णालयांची पाहणी केली. आमदार डाॅ. किरण लहामटे यांच्या प्रयत्नातून अकोले ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प साकारत असून, या कामाची व ऑक्सिजन सुविधा बेड कोविड सेंटर उभारणीची पाहणी केली. मुख्याधिकारी क्षीरसागर यांनी शिक्षकांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या सुगाव कोविड सेंटर, तसेच राजूर व अकोले ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी अकोले ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लॅन्टच्या उभारणीच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार मुकेश कांबळे, कैलास वाकचाैरे, गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. इंद्रजित गंभिरे, वैद्यकीय अधीक्षक डाॅ. संजय घोगरे, डाॅ. बाळासाहेब मेहेत्रे, डाॅ. सुनील साळुंके उपस्थित होते.
लवकरच तालुक्यात दुसरा ऑक्सिजन प्लॅन्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:18 IST