सोनोग्राफी सेंटरचालकांचा बेमुदत बंद
By Admin | Updated: June 19, 2016 23:12 IST2016-06-19T23:06:17+5:302016-06-19T23:12:22+5:30
अहमदनगर : राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारपासून (दि. २०) सोनोग्राफी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सोनोग्राफी सेंटरचालकांचा बेमुदत बंद
अहमदनगर : पुण्यातील डॉ. जपे यांचेवर झालेल्या अन्यायकारक कारवाई विरोधात दाद मागूनही सरकारने न्याय दिलेला नाही. यामुळे राज्यभरातील डॉक्टरांनी सोमवारपासून (दि. २०) सोनोग्राफी बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनात सोनोग्राफी व्यतिरिक्त अन्य सुविधा रुग्णांसाठी सुरू ठेवण्यात येणार आहे. नगरमधील सोनोेग्राफी सेंटर चालक या बेमुदत आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती इंडियन रेडिओलॉजी अॅण्ड इमेजिंग असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. धनंजय वाघ व सचिव डॉ. संदीप वाबळे यांनी दिली. (प्रतिनिधी)