सोनोग्राफी, रेडिओलॉजी सेंटर चालकांचा संप
By Admin | Updated: June 14, 2016 23:19 IST2016-06-14T23:12:01+5:302016-06-14T23:19:44+5:30
अहमदनगर : गर्भलिंग निदान कायद्यातील अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात, पुण्यातील डॉ. आशुतोष जपे यांच्यावर झालेली अन्यायकारक कारवाई मागे घेण्यात यावी.

सोनोग्राफी, रेडिओलॉजी सेंटर चालकांचा संप
अहमदनगर : गर्भलिंग निदान कायद्यातील अन्यायकारक तरतुदी रद्द कराव्यात, पुण्यातील डॉ. आशुतोष जपे यांच्यावर झालेली अन्यायकारक कारवाई मागे घेण्यात यावी. डॉ. जपे यांच्यावर कारवाई करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या अधिकारी डॉ. वैशाली जाधव यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी नगरमधील सोनोग्राफी, रेडिओलॉजी सेंटर चालकांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप केला. आंदोलनात शहर आणि जिल्ह्यातील ५० सेंटर बंद ठेवण्यात आले.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ. धनंजय वाघ यांनी स्पष्ट केले, गर्भलिंग प्रतिबंध कायदा आल्यापासून जवळपास सोनोग्राफीद्वारे स्त्रीभूण चाचणी बंद झालेली आहे. असे असताना राज्यात अनेक ठिकाणी अधिकारी विनाकारण कायद्याचा बडगा दाखवून डॉक्टरांना त्रास देत आहेत. सोनोग्राफी केल्यानंतर संबंधीत रुग्णाची माहिती आॅनलाइन पद्धतीने टाकावी लागते. यात ९० प्रकाराची माहिती भरत असताना काही त्रुटी राहू शकतात. या त्रुटीवर थेट सोनोग्राफी सेंटर बंद करण्याची कारवाई योग्य नाही. असा प्रकार पुण्यातील डॉक्टर जपे यांच्या बाबतीत घडलेला आहे.
सरकारने तातडीने सोनोग्राफी, रेडिओग्राफी सेंटर चालकांची मागणी मान्य न केल्यास पुढील आठवड्यात राज्यव्यापी आंदोलन करण्याची तयारी सुरू केली असल्याची माहिती डॉ. वाघ यांनी दिली.