सोमनाथ होळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:38 IST2021-03-04T04:38:18+5:302021-03-04T04:38:18+5:30

श्रीगोंदा : मुंबईतील राजभवनात झालेल्या सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्याशी ...

Somnath Holkar honored by the Governor | सोमनाथ होळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

सोमनाथ होळकर यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

श्रीगोंदा : मुंबईतील राजभवनात झालेल्या सोहळ्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते श्रीगोंदा तालुक्याशी घनिष्ठ संबंध असलेले पुणे येथील उद्योजक सोमनाथ होळकर यांना नुकताच प्रदान करण्यात आला.

सागा फिल्म फाउंडेशनने आयोजित केलेल्या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून खासदार उदयनराजे भोसले, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, सागर धापटे आदी उपस्थित होते.

यावेळी इतरांसाेबतच सोमनाथ होळकर यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सोमनाथ होळकर म्हणाले, टाटा कंपनीतील नोकरी ते यशस्वी उद्योजक म्हणून प्रवास करताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावे लागले. याबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यामुळे यापुढे अधिकच जबाबदारीने काम करावे लागणार आहे. या पुरस्काराबद्दल होळकर यांचे माजी उपनगराध्यक्ष अशोक खेंडके, शहाजी खेतमाळीस, शांताराम पोटे, नाना कोंथिबिरे यांनी अभिनंदन केले.

--

०३ सोमनाथ होळकर

Web Title: Somnath Holkar honored by the Governor