शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनात एकाने डोळा मारला, नक्की झालं काय?; इंदोरीकर महाराजांनाही पडला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2023 15:30 IST

अहमदनगर जिल्ह्यातील केलवड गावात शिवजयंती निमित्त कीर्तन

नितीन गमे

राहाता (जि. अहमदनगर) : काल अधिवेशनात एकाने डोळा मारला, डोळा मारत असताना १५ मिनिटे चित्र दाखवण्यात आले, पण यात नक्की झालं काय ? असा सवाल निवृत्ती महाराज  इंदोरीकर यांनी  केलवड गावातील चालू शिवजयंती कीर्तनात उपस्थित केला. कीर्तनात ते असेही म्हणाले की, सोशल मीडियात व्हायरल झालेल्या दहावीच्या वेळापत्रकामुळे ८ तारखेला हिंदीचा होणारा पेपर ९ तारखेला दाखवण्यात आला. त्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले, सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवू नये.        शुक्रवारी राहाता तालुक्यातील केलवड गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले. त्यावेळी ते बोलत होते. अधिवेशनात डोळा मारला असे इंदोरीकर बोलताच राजकीय जाणकारांत चर्चा सुरू झाली. गुरुवारी अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडले यावेळी अधिवेशन सभागृह आवारात राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांशी बोलत असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बोलण्यासाठी त्यांनी जागा उपलब्ध केली. ठाकरे बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी समोरच्या एका व्यक्तीला डोळा मारला होता. परंतु तो डोळा मारण्यामागे कारण काय होते हे कुणाला समजू शकले नाही. त्यात आता इंदोरीकर महाराज यांनी कुणाचेही नाव न घेता डोळा मारल्याचे म्हणताच एकच चर्चा रंगली .            केलवड गावातील अयोध्या युवा प्रतिष्ठानच्या वतीने गावात जंगी नियोजन करण्यात आले होते, शिवनेरी ते केलवड पायी शिवज्योत सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला यामध्ये गावातील नरेश राऊत फाउंडेशनचे सचिव प्रा लक्ष्मण गोर्डे यांनी मोठी देणगी दिली तसेच अयोध्या युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उपसरपंच विशाल वाघे यांनी तगडे नियोजन केले होते .  गावातील अनेक ग्रामस्थांनी या कार्यक्रमासाठी मोठा हातभार लावला . त्यामुळे शिवजयंती निमित्त इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती .

टॅग्स :indurikar maharajइंदुरीकर महाराजAhmednagarअहमदनगरAjit Pawarअजित पवारSocial Mediaसोशल मीडिया