छायाचित्रण स्पर्धेत सोमाणी, शहा प्रथम
By Admin | Updated: October 7, 2016 00:49 IST2016-10-07T00:22:05+5:302016-10-07T00:49:40+5:30
अहमदनगर : वन्यजीवांच्या छायाचित्रांची राज्यस्तरीय स्पर्धा व प्रदर्शन भरवून अहमदनगरच्या फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास संघटनेचे सामाजिक जनजागृतीबरोबरच

छायाचित्रण स्पर्धेत सोमाणी, शहा प्रथम
अहमदनगर : वन्यजीवांच्या छायाचित्रांची राज्यस्तरीय स्पर्धा व प्रदर्शन भरवून अहमदनगरच्या फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास संघटनेचे सामाजिक जनजागृतीबरोबरच आपली वन्यजीव संपदा सामान्यासमोर मांडण्याचे अनमोल कार्य केले असल्याचे प्रतिपादन जिल्हा उपवनसंरक्षक ए. लक्ष्मी यांनी केले.
फोटोग्राफर बहुउद्देशीय विकास संघटनेच्या वतीने वन्यजीव सप्ताह दिनानिमित राज्यस्तरीय व वाइल्ड लाइफ फोटोग्राफीची स्पर्धा भरविण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. या वेळी छायाचित्रकार बैजू पाटील, प्रमोद कांबळे, डॉ. सुधाकर कुऱ्हाडे, संजय दळवी, राजेश परदेशी, मंदार साबळे, नितीन भिसे, राहुल विळदकर, सुरेश मैड, मच्छिंद्र इंगळे उपस्थित होते. या स्पर्धेमध्ये राज्यामधून सहाशे फोटोग्राफरने प्रवेशिका सादर केल्या होत्या. पैकी निवडक दोनशे छायाचित्रणांची निवड करून प्रदर्शनात फोटोग्राफ लावण्यात आले होते. यामध्ये व्यावसायिक व हौशी छायाचित्रकार यांचा समावेश होता. या वेळी पाटील म्हणाले, ‘‘वाइड लाइफ फोटोग्राफी केवळ आव्हानतमक नाही, तर प्रचंड संयम ठेवून प्राणी विश्व जगासमोर मांडणारी अनोखी कला आहे. या स्पर्धेमध्ये अंबाजोगाई येथी मुन्ना सोमाणी यांची व्यावसायिक व अहमदनगर येथील पराग शहा यांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली. त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला. दुसरा क्रमांक ज्ञानेश्वर कातकडे व हृषीकेश लांडे यांनी पटकाविला. तिसरा क्रमांक सुधीर नजरे व परदेशी ठाकूरदास यांना, तर नितीन केदारी, गोपालकृष्ण पत्की यांच्या छायाचित्रांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गाबडे, यांनी तर अध्यक्ष नितीन भिसे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी सुरेश भुसा, नितीन केदारी, शिवाजी चेमटे, दिगंबर कुटे, राहुल जोशी, अभिजित अष्टेकर, अभी कोलाहारे, रंजित कर्डिले, सचिन अगरवाल, संतोष कुलकर्णी, उपेंद्र करपे, विजय साळी, सतीश टेमक, संतोष साळवे, अतुल कांबळे ,सचिन खटावकर, तुषार मेघळे, गणेश नामन यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)