भिंगारचे प्रश्न सोडविणे हीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:18 IST2021-03-24T04:18:18+5:302021-03-24T04:18:18+5:30

भिंगार : स्वर्गीय अनिल राठोड, दिलीप गांधी आणि रामकृष्ण पिल्ले यांनी आपापल्या पक्षावर निष्ठा कायम ठेवून, पक्षविरहित लोक जोडण्याचे ...

This is the solution to the problem of Bhingar | भिंगारचे प्रश्न सोडविणे हीच

भिंगारचे प्रश्न सोडविणे हीच

भिंगार : स्वर्गीय अनिल राठोड, दिलीप गांधी आणि रामकृष्ण पिल्ले यांनी आपापल्या पक्षावर निष्ठा कायम ठेवून, पक्षविरहित लोक जोडण्याचे काम केले. लोकांच्या समस्यांना वाचा फोडली. भिंगारचा पूल, पाणीप्रश्न, किल्ला सुशोभिकरणाचे मुद्दे या तिघांनी आक्रमकपणे मांडले. भिंगारच्या एफएसआयचा प्रश्न हा तिघांच्याही जिव्हाळ्याचा होता. मात्र तो अद्याप सुटला नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन तो प्रश्न सोडविला तर तीच खऱ्या अर्थाने चौघांना श्रद्धांजली ठरेल, असे मत कॅन्टोमेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे यांनी व्यक्त केले.

भिंगार येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सभागृहात भिंगार शहरवासीयांच्या वतीने सर्व पक्षीय श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेचे अध्यक्ष संभाजीराव भिंगारदिवे होते, तर व्यासपीठावर भाजपा महिला उपाध्यक्ष शुभांगी साठे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संजय सपकाळ, काँग्रेसचे प्रदेश सदस्य श्यामराव वाघस्कर, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे, पिल्ले यांचे ज्येष्ठ बंधू गोपाळराव पिल्ले, सेवा दल उपाध्यक्ष कौसर महेमुद खान उपस्थित होते.

अनिल राठोड यांचा भिंगारवर विशेष लोभ होता. साध्या कार्यकर्त्याने फोन केला तरी काही मिनिटांत अनिल भय्या हजर होते. दोघांनीही भिंगारसाठी आपापल्यापरीने समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला. ॲड. रामकृष्ण पिल्ले हे सलग तीन वेळा बोर्डचे उपाध्यक्ष होते. त्यावेळीही त्यांनी विकासाची अनेक कामे केली. भिंगार एसटी स्टॅण्ड, सदर बाजार ही बाजारपेठ पिल्ले यांच्या कारकिर्दीत वसली. सुभाषचंद्र पाटील यांचे ज्येष्ठ नागरिक संघासाठीचे काम उल्लेखनीय असून, या चारही व्यक्तींनी भिंगारसाठी मोलाचे योगदान दिले आहे.

जिल्हा काँग्रेसचे ॲड. साहेबराव चौधरी, ज्येष्ठ काँग्रेस नेते अनिल परदेशी, शहर काँग्रेसच्या सरचिटणीस नलिनी गायकवाड, भाजपाचे अध्यक्ष वसंत राठोड, फिनिक्स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, वंचित बहुजन आघाडीचे विकास चव्हाण, नगर काँग्रेसचे बाळासाहेब भुजबळ, विशाल बेलपवार, शुभम पिल्ले यांची भाषणे झाली.

रिजवान शेख, ज्योत्स्ना मुंगी, सुरेश कांबळे, बी. सी. बडवे, बी. आर. कांबळे, मुकुंद बोधे, रमेश कडूस, श्याम चौरे, रमेश वराडे, सुधाकर चिंदबरम, अशोक जाधव, बाळासाहेब पत्की, शिवाजी दहिंडे, आनंद बोथरा, किशोर कटोरे, फिरोज खान, भाऊराव बिडवे, अनंत रासने, सुभाष होडगे, सागर चाबुकस्वार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल बेलपवार यांनी केले.

२३भिंगार

Web Title: This is the solution to the problem of Bhingar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.