श्रीगोंद्यातील सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2020 16:36 IST2020-06-26T16:35:04+5:302020-06-26T16:36:03+5:30
देशाची सेवा करणा-या सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणारी अभिनेत्री एकता कपूर हिचा श्रीगोंद्यातील आजी, माजी सैनिकांनी निषेध केला. श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (२६ जून) सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तिचा निषेध केला.

श्रीगोंद्यातील सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला मारले जोडे
श्रीगोंदा : देशाची सेवा करणा-या सैनिकांच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरणारी अभिनेत्री एकता कपूर हिचा श्रीगोंद्यातील आजी, माजी सैनिकांनी निषेध केला. श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर शुक्रवारी (२६ जून) सैनिकांनी एकता कपूरच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारून तिचा निषेध केला.
त्रिदल सैनिक संघटनेच्या पदाधिका-यांनी अप्पर तहसीलदार चारुशीला पवार यांना विविध मागण्याचे निवेदन दिले.
अभिनेत्री एकता कपूरने सैनिकांच्या पत्नीबाबत अपशब्द वापरून भारतीय सैनिकांचा अपमान केला आहे. एकता कपूरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा. अन्यथा देशभर आजी, माजी सैनिक आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहेत, असे त्रिदल सैनिक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप लगड यांनी सांगितले.
यावेळी संदीप सांगळे, संतोष जाधव मेजर, शरद म्हस्के, महेंद्र जगदाळे, श्रीमती सुजाता संतोष जाधव, संपत शिररसाठ, शिवाजी कुदांडे, सुरेश निभोंरे, उध्दव खामकर सोमनाथ गावडे आदि सैनिक उपस्थित होते.