तिरंग्याच्या बॉक्समध्ये चपला विकणाऱ्याला अटक
By Admin | Updated: May 30, 2017 17:15 IST2017-05-30T15:04:44+5:302017-05-30T17:15:52+5:30
अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटने त्यांच्या वस्तूंच्या माध्यमातून तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना आपण या आधी पाहिल्या आहेत. पण आता चक्क भारतातच तिरंग्याचा अपमान झाल्याची घटना घडली आहे.

तिरंग्याच्या बॉक्समध्ये चपला विकणाऱ्याला अटक
>ऑनलाइन लोकमत
जयपुर, दि. 30- अॅमेझॉन या ऑनलाइन शॉपिंग वेबसाइटने त्यांच्या वस्तूंच्या माध्यमातून तिरंग्याचा अपमान केल्याच्या घटना आपण या आधी पाहिल्या आहेत. पण आता चक्क भारतातच तिरंग्याचा अपमान झाल्याची घटना घडली आहे. राजस्थानच्या कोटामधील सिटी मॉलमध्ये ही घटना घडली आहे. मॉलमधून चपलांच्या दुकानात तिरंगा चिकटवलेल्या बॉक्समधून चपला विकल्या जात होत्या. यामुळे तेथील लोकांनी संताप व्यक्त केलाच पण त्याबरोबर पोलिसांमध्ये तक्रारही दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी राष्ट्रीय सन्मान कायदा 1971 च्या अंतर्गत तिरंग्याचा अवमान केल्या प्रकरणी तक्रार दाखल करून घेतली आहे.
क्रांती तिवारी नावाच्या एका व्यक्तीने रविवारी संध्याकाळी या संदर्भातील तक्रार केली होती. सिटी मॉलमधील दुकान नंबर 24मध्ये ज्या बॉक्समध्ये चपला विकल्या जात होत्या त्या बॉक्सवर तिरंगा चिकटवला होती, अशी माहिती तक्रारकर्त्याने पोलिसांनी दिली आहे. तक्रारकर्ते क्रांती तिवारी हे इकाईच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष आहेत.
क्रांती तिवारी यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्या चपलांच्या दुकानात धाड टाकली. "सिटी मॉलच्या त्या दुकानात आरोपीला पकडण्यात आलं तसंच राष्ट्रीय सन्मान कायदा 1971 नुसार तिरंग्याचा अवमान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. जर आरोपीवर आरोप निश्चिती झाली तर त्याला एक वर्षाचा कारावास होऊ शकतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
सिटी मॉसमध्ये महेश नावाचा व्यक्ती तिरंगा चिकटवलेल्या बॉक्समधून लोकांना चपला विकत होता. महेश हा दिल्लीवरून चायना मेड चपला आणतो, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. महेश या चपला आणि बॉक्स कुठुन आणतो याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्या दुकानदारांना समन्स बजावल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.