काळकूप येथे जवानाचा भावावर सशस्त्र हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 15:08 IST2018-03-30T15:08:27+5:302018-03-30T15:08:42+5:30

जवान उत्तम यादव शिंदे यांनी त्यांचा सख्खा भाऊ मोहन यादव शिंदे याच्यावर लोखंडी गजाने हल्ला केला.

soldier armed attack on brother in Kalakup | काळकूप येथे जवानाचा भावावर सशस्त्र हल्ला

काळकूप येथे जवानाचा भावावर सशस्त्र हल्ला

भाळवणी : पारनेर तालुक्यातील काळकूप येथे घरगुती वादावरून सख्या दोन भावांमध्ये गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास हाणामारी झाली. यामध्ये जवान उत्तम यादव शिंदे यांनी त्यांचा सख्खा भाऊ मोहन यादव शिंदे याच्यावर लोखंडी गजाने हल्ला केला. यात त्याचा भाऊ मोहन यादव शिंदे हे जखमी झाले आहेत.
पारनेर येथील ग्रामीण रुग्णालयात जखमी मोहन यादव याच्यावर उपचार सुरू आहेत. उत्तम यादव शिंदे यांच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल चौधरी हे करीत आहेत. जवान उत्तम यादव शिंदे हे बी.एस.एफ.मध्ये लातूर येथे सेवेत कार्यरत आहेत. मात्र ते आता सुटीसाठी गावी आलेले आहेत.

Web Title: soldier armed attack on brother in Kalakup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.