समाजाला हिरव्या मशालीची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:39 IST2021-02-21T04:39:49+5:302021-02-21T04:39:49+5:30

नेवासा : समाजाला आज खऱ्या अर्थाने हिरव्या मशालीची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी ...

Society needs a green torch | समाजाला हिरव्या मशालीची गरज

समाजाला हिरव्या मशालीची गरज

नेवासा : समाजाला आज खऱ्या अर्थाने हिरव्या मशालीची गरज आहे, असे प्रतिपादन यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांनी केले.

आदर्शगाव मोरया चिंचोरे (ता. नेवासा) येथे यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रशांत गडाख व ज्येष्ठ अभिनेते ‌सयाजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कार डोंगरावर ३९१ वृक्ष लागवड करून शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

गडाख म्हणाले, शिवजयंती निमित्त वृक्ष लागवडीचा संकल्प या वर्षापासून करण्यात आला. आपण शिवरायांचे मावळे आहोत आणि प्रत्येक गडावर आणि सह्याद्रीच्या कुशीत झाडांच्या हिरव्या मशाली वाढवू हा अभिनेते सयाजी शिंदे यांचा संकल्प मोरया चिंचोरे येथील कार डोंगरावर पूर्णत्वास नेला.

याप्रसंगी सरपंच जयश्री राजेंद्र मंचरे, आदर्श गाव समितीचे अध्यक्ष अंबादास इलग, उपसरपंच बाळासाहेब मोरे, कारभारी मोरे, गणेश मोरे, जालिंदर गवळी, अमृत पाटील, संदीप सरकाळे, प्रा. योगेश जाधव, देवदत्त दरंदले, समन्वयक बाबासाहेब दराडे, मुख्याध्यापक शिवाजी कर्जुले, स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

फोटो ओळी २० गडाख

मोरया चिंचोरे येथे शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी ३९१ वृक्षांची लागवड करत शिवजयंती साजरी केली.

Web Title: Society needs a green torch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.