महिला सरपंचांनी जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:14 IST2021-07-05T04:14:40+5:302021-07-05T04:14:40+5:30
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रस्ते दुरुस्तीचे काम करत सामाजिक ...

महिला सरपंचांनी जपली सामाजिक बांधिलकी
देवदैठण : श्रीगोंदा तालुक्यातील राजापूर येथील सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व रस्ते दुरुस्तीचे काम करत सामाजिक बांधिलकी जपली.
मेंगलवाडीमध्ये त्यांनी विविध कामे मार्गी लावली. त्यात बोरी फाटा, धावडे वस्ती, पाटील मळा, कोरडे मळा या ठिकाणच्या वस्ती रस्त्यांचे मुरुमीकरण करून खड्डे बुजविण्यात आले. राजापूर येथील ग्रामपंचायत कार्यालय व प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंगलवाडी, मंदिर परिसरात नारळ, वड, आंबा, फुलझाडे यांचे वृक्षारोपण केले.
याप्रसंगी सरपंच प्रतीक्षा मेंगवडे, गोलेगावच्या ग्रामविकास अधिकारी शीतल धावडे, सविता शिंदे, आनंदा ढवळे, प्रियंका मेंगवडे, पूजा धावडे, विद्या मेंगवडे, मोहिनी धावडे, शांता व्यवहारे, विठ्ठल वीर, पोपटराव कौठाळे, राजाराम धावडे, सुजित धावडे, वैभव कोरडे, दिलीप कोरडे आदी उपस्थित होते.
-----
कोरोना काळात प्रत्येकाला ऑक्सिजनचे महत्त्व पटले आहे. त्यामुळे गावातील प्रत्येकाने वाढदिवस, लग्न व इतर आनंदाच्या प्रसंगी एक तरी झाड लावून त्याचे संवर्धन करावे. त्यामुळे निसर्गाचा समतोल राखण्यास मदत होईल.
-प्रतीक्षा मेंगवडे
सरपंच, राजापूर
-----
०४राजापूर
राजापूर येथे वृक्षारोपण करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गामस्थ.
040721\img_20210704_084217.jpg
श्रीगोदा तालुक्यातील राजापूर येथे सरपंच प्रतिक्षा मेंगवडे यांनी वाढदिवसानिमित्त वृक्षारोपन केले . ( छायाचित्र - संदीप घावटे )