तर माझ्यासह संचालक मंडळ राजीनामा देणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:12+5:302021-01-03T04:22:12+5:30
शनिवारी सकाळी डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी कारखान्याची ...

तर माझ्यासह संचालक मंडळ राजीनामा देणार
शनिवारी सकाळी डॉ. सुजय विखे यांच्या प्रमुख उपस्थितीत तनपुरे कारखान्याच्या कार्यस्थळावर संचालक मंडळाची बैठक झाली. या बैठकीत त्यांनी कारखान्याची सद्यस्थिती व सुरळीत करण्यासाठी विचारविनिमय झाला. कारखान्याचे अध्यक्ष नामदेवराव ढोकणे, माजी अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष दत्ता पाटील ढूस यांच्यासह कारखान्याचे संचालक, अधिकारी. कामगार यावेळी उपस्थित होते.
विखे म्हणाले, कारखान्याच्या विस्तारिकरणासाठी नुकताच आठ ते दहा कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ३५०० मेट्रीक टनावरून ४२५० मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे. तरीही कारखान्याचा गळीत हंगाम धोक्यात आला आहे. कारखाना सुरळीत चालत नसल्याने गणिताचा प्रश्न गंभीर झाला आहे. गेल्या साडेचार वर्षांपासून तनपुरे कारखाना सुरळीत चालावा यासाठी मी आणि संचालक मंडळ आणि कामगारांनी प्रामाणिक प्रयत्न केले. गेल्या दोन महिन्यांपासून हा कारखाना सुरू राहावा, वेळेवर उसाचे गाळप व्हावे, शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून अहोरात्र प्रयत्न केले. परंतु, अनेक अडचणी येत आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करूनही हा कारखाना सुरू होऊ शकत नाही, याबद्दल मला खेद वाटतो. हा कारखाना सुरळीत चालू न देण्यासाठी काही शक्ती कार्यरत आहेत. त्यामुळे मानवनिर्मित दोष कारखान्यामध्ये आढळून येत आहेत. पुढील ७२ तासांत जर सुरळीत कारखाना चालला नाही तर आम्हाला राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय राहणार नाही.
...................
६४ दिवसांत १५ हजार मेट्रिकचे गाळप
कारखान्याचा गळीत हंगाम सुरू होऊन ६४ दिवस झाले आहेत. या कालावधीत फक्त पंधरा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. कारखान्याकडे कार्यक्षेत्रातील दहा लाख मेट्रिक टनापैकी सहा लाख मेट्रिक टनाची नोंद झालेली आहे. या परिस्थितीत गाळपाचा प्रश्न अत्यंत गंभीर बनलेला आहे. ६४ दिवसांत एकदाही सलग २४ तास कारखाना सुरू नव्हता, असेही विखे म्हणाले.
(०२सुजय विखे)