स्नेहल मेहेत्रे हिला अमेरिकेतील विद्यापीठाची पदवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:59+5:302020-12-15T04:36:59+5:30

अकोले : तालुक्यातील शेकईवाडी येथील स्नेहल बाळासाहेब मेहेत्रे हिने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठाची एम.एस. ही उच्च पदवी संपादित केली आहे. ...

Snehal Mehta holds a university degree from the United States | स्नेहल मेहेत्रे हिला अमेरिकेतील विद्यापीठाची पदवी

स्नेहल मेहेत्रे हिला अमेरिकेतील विद्यापीठाची पदवी

अकोले : तालुक्यातील शेकईवाडी येथील स्नेहल बाळासाहेब मेहेत्रे हिने अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठाची एम.एस. ही उच्च पदवी संपादित केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन कार्यक्रमात तिला ही पदवी प्रदान करण्यात आली. स्नेहल ही अकोले येथील मॉडर्न विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिने दहावीच्या परीक्षेतही प्रथम क्रमांक मिळवला होता. पुणे येथील कमिन्स महिला अभियांत्रिकी महाविद्यालयातून तिने बी. ई. संगणक व एमबीए या पदव्या संपादन केल्या आहेत. अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील युनिव्हर्सिटी ऑफ सॅनफ्रान्सिस्को विद्यापीठात एम.एस. हा दोन वर्षांचा पदव्युत्तर अभ्यासक्रम तिने पूर्ण केला. अगस्ती महाविद्यालयातील ज्येष्ठ प्राध्यापक व पत्रकार प्रा. बाळासाहेब मेहेत्रे व प्रवरा विद्यालय इंदोरीतील माध्यमिक शिक्षिका सविता मेहेत्रे यांची ती कन्या आहे. माजी मंत्री मधुकरराव पिचड, माजी आमदार वैभव पिचड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अभिनव शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मधुकरराव नवले, जि.प.च्या अर्थ व बांधकाम समितीचे माजी सभापती कैलास वाकचौरे, ज्येष्ठ नेते मीनानाथ पांडे, अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जे. डी. आंबरे, सेक्रेटरी यशवंत आभाळे, अगस्ती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष के.डी. धुमाळ, अगस्ती पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर, प्राचार्य डॉ. भास्कर शेळके, प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमुख, मॉडर्न विद्यालयाचे प्राचार्य संतोष कचरे, मुख्याध्यापक लक्ष्मण सावंत, माजी प्राचार्य शिरीष देशपांडे, माजी प्राचार्य आयाज शेख आदींनी कौतुक केले आहे.

--

फोटो- १४ स्नेहल बाळासाहेब मेहेत्रे

Web Title: Snehal Mehta holds a university degree from the United States

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.