गोदावरीतून वाळूची चोरटी वाहतूक सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 11:58 IST2020-06-22T11:57:20+5:302020-06-22T11:58:48+5:30

कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून चोरटी वाहतूक करणाºया विना क्रमांकाचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा टॅÑक्टर-ट्रेलर वाळूसह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (दि.२१ ) पोलिसांनी ही कारवाई केली.

Smuggling of sand from Godavari continues, tractor caught | गोदावरीतून वाळूची चोरटी वाहतूक सुरूच

गोदावरीतून वाळूची चोरटी वाहतूक सुरूच

कोपरगाव : तालुक्यातील संवत्सर येथील गोदावरी नदीच्या पात्रातून चोरटी वाहतूक करणाºया विना क्रमांकाचा स्वराज कंपनीचा निळ्या रंगाचा टॅÑक्टर-ट्रेलर वाळूसह पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. रविवारी (दि.२१ ) पोलिसांनी ही कारवाई केली.

या प्रकरणी पोलीस हवालदार जयदीप गवारे यांनी लक्ष्मण छबू माळी ( वय ३२ रा.मनाई वस्ती, शिंगणापूर ता.कोपरगाव ) व अशोक विजय गायकवाड ( रा.मनाई वस्ती, संवत्सर शिवार, ता. कोपरगाव)  याच्यावर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील लक्ष्मण माळी यास अटक केली आहे. तर अशोक गायकवाड हा फरार आहे. या कारवाईत टॅÑक्टर-ट्रेलर व वाळूसह एकूण ३ लाख ६० हजार रुपयांचा मुदेमाल हस्तगत केला आहे. पुढील तपास पोलीस नाईक ए.एम.दारकुंडे करीत आहेत.  

Web Title: Smuggling of sand from Godavari continues, tractor caught