माजी सैनिकाची हत्या करणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:19 IST2021-04-13T04:19:20+5:302021-04-13T04:19:20+5:30
सुधीर संभाजी सिरसाठ (२६, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (२४, रा. शिक्षककॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (२१, रा. ...

माजी सैनिकाची हत्या करणाऱ्या चौघांच्या आवळल्या मुसक्या
सुधीर संभाजी सिरसाठ (२६, रा. आसरानगर, पाथर्डी), आकाश पांडुरंग वारे (२४, रा. शिक्षककॉलनी पाथर्डी), आकाश मोहन डुकरे (२१, रा. विजयनगर, पाथर्डी), गणेश सोन्याबापू जाधव (२३, रा. शंकरनगर पाथर्डी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून कारवाई दरम्यान पाचवा आरोपी केतन जाधव हा फरार झाला.
टाकळी फाटा येथील मच्छिंद्र फुंदे यांच्या हॉटेलसमोर ६ एप्रिल रोजी आरोपी सुधीर शिरसाठ याने गाडी उभी केली होती. यावेळी मच्छिंद्र यांचा भाऊ विश्वनाथ यांनी सिरसाठ यास गाडी बाजूला घेण्याचे सांगितले होते. त्याचा राग मनात धरून शिरसाठ याने त्याच्या साथीदारांना बोलावून मच्छिंद्र फुंदे यांना मारहाण केली. तसेच त्यांना जबरदस्तीने गाडीमध्ये बसवून पाथर्डी येथे आणून पुन्हा मारहाण केली. या मारहाणीत फुंदे यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पाचही आरोपी फरार झाले होते. आरोपी हे कानडगाव परिसरातील डोंगरात लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मनोज गोसावी, पोलीस नाईक सचिन आडबल, विशाल दळवी, संतोष लोढे, रोहित येमुल, विनोद मासाळकर, जालिंदर माने, मेघराज कोल्हे, निलेश म्हस्के, भगवान सानप, राहुल खेडकर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
ओळी- माजी सैनिकाची हत्या करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.