डिजिटल शिक्षणासाठी माजी विद्यार्थ्याकडून शाळेला स्मार्ट टीव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:25 IST2021-08-22T04:25:36+5:302021-08-22T04:25:36+5:30

नेवासा : नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक (मुले) शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व डिजिटल शिक्षण मिळावे या उद्देशाने माजी ...

Smart TV to school from alumni for digital education | डिजिटल शिक्षणासाठी माजी विद्यार्थ्याकडून शाळेला स्मार्ट टीव्ही

डिजिटल शिक्षणासाठी माजी विद्यार्थ्याकडून शाळेला स्मार्ट टीव्ही

नेवासा : नेवासा खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक (मुले) शाळेतील विद्यार्थ्यांना अत्याधुनिक व डिजिटल शिक्षण मिळावे या उद्देशाने माजी विद्यार्थी डॉ. रवींद्र गायकवाड यांनी शाळेस स्मार्ट टीव्ही भेट दिला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊनच्या काळात मुलांचे शिक्षण सुरू राहावे यासाठी शाळेतील शिक्षकांनी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत शाळेच्या प्रगतीस गती देण्यासाठी नुकत्याच शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमामध्ये शांताराम गायकवाड यांच्या हस्ते हा स्मार्ट टीव्ही शाळेस सुपूर्द केला. यावेळी नेवासा वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखधान, केंद्रप्रमुख भाऊसाहेब जगताप, मुख्याध्यापक अरविंद घोडके, उस्ताद ख्वाजा उपस्थित होते.

शाळेचे शिक्षक राहुल आठरे यांनी यासाठी पुढाकार घेतला. यावेळी शिक्षिका प्रतिभा पालकर, छाया वाघमोडे, विद्या खामकर, मीनाक्षी लोळगे, ज्योती गाडेकर, अश्विनी मोरे, प्रतिभा गाडेकर, प्रतिमा राठोड, अण्णासाहेब शिंदे, आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन राहुल आठरे यांनी केले. साईनाथ वडते यांनी आभार मानले.

Web Title: Smart TV to school from alumni for digital education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.