कत्तलखान्यावर छापा, २७ जनावरांची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:47 IST2021-09-02T04:47:16+5:302021-09-02T04:47:16+5:30
नेवासा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी गल्लीत सोनई पोलिसांनी बुधवारी छापा टाकून अवैद्य पद्धतीने तस्करी व खरेदी ...

कत्तलखान्यावर छापा, २७ जनावरांची सुटका
नेवासा : नेवासा तालुक्यातील चांदा येथील कुरेशी गल्लीत सोनई पोलिसांनी बुधवारी छापा टाकून अवैद्य पद्धतीने तस्करी व खरेदी करून औरंगाबाद येथील कत्तलखान्यात नेत असलेल्या २७ गाय, बैल व वासरांची सुटका केली. या कारवाईत १८ लाख ८३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात येऊन तीन जणांना अटक करण्यात आली, तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले आहे.
याबाबत मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर थोरात व पथकाने काल मंगळवारी सायंकाळी छापा टाकून ७ लाख ८३ हजार रुपये किमतीची २७ जनावरे ताब्यात घेतली. याशिवाय विनापरवाना वाहतुकीसाठी आणलेले ११ लाख रुपये किमतीचे दोन टॅम्पो एमएच १६ सीसी ८५९४ व एमएच १७ बीडी ११२ दोन पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर वाघ यांच्या फिर्यादीवरून अजहर ताहीर शेख (वय २९, रा. कुरेशी मोहल्ला, चांदा ता. नेवासा,) जुनेद अब्बास शेख (वय २१, वर्षे रा. सुमित्रा कॉलनी, निराला बाजार, औरंगाबाद), भगवान विष्णू धुमाळ, (वय ४७, रा. लोहारवाडी रस्ता, चांदा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. इशद कदिर शेख व शनी पठाण दोघे रा. चांदा, ता. नेवासा फरार झाले आहेत.
010921\img-20210901-wa0059.jpg
प्रेस नोट महितीसाठी