सोळा हजार बेड सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:21 IST2021-04-21T04:21:48+5:302021-04-21T04:21:48+5:30

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही आता कंबर कसली आहे. जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधी, ...

Sixteen thousand beds ready | सोळा हजार बेड सज्ज

सोळा हजार बेड सज्ज

अहमदनगर : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्हा प्रशासनानेही आता कंबर कसली आहे. जास्तीत जास्त बेड उपलब्ध करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, स्थानिक प्रशासनानेही यासाठी पुढाकार घेतला आहे. नवे कोविड सेंटरही ग्रामीण भागात उभे करण्यात येत आहेत. सध्या ९ हजार जणांना एकाच वेळी उपचार करता येतील, एवढी आरोग्य यंत्रणा सध्या सज्ज असून ती कार्यरत ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकारी, कर्मचारी रात्रं-दिवस काम करीत असल्याचे दिसते आहे. जिल्ह्यात शासकीय व खासगी रुग्णालये, शासकीय व खासगी कोविड सेंटरमध्ये १६ हजार बेड सज्ज असून या बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.

------------

बेडची मागणी व उपलब्धता

बेड मागणी उपलब्ध

कोविड सेंटर बेड ९००० ९१३०

कोविड हॉस्पिटल बेड ३६०० ४७६६

ऑक्सिजन बेड २७०० २३४५

आयसीयू बेड ९०० ९१२

व्हेंटिलेटर ३०० २८६

-------------------

डिस्ट्रिक्ट कोविड हॉस्पिटल (सीसीएच) कोविड हॉस्पिटल (डीसीएच) जिल्हा रुग्णालय ०१

साईबाबा हॉस्पिटल ०२

ग्रामीण जिल्हा ६०

शहरी भाग १६

एकूण ७९

-------------------

डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी)

शासकीय-१२

खासगी-८५

नगर शहर-४१

एकूण-१५०

---------------

तालुकानिहाय बेडची उपलब्धता

तालुका सीसीसी संख्या बेड संख्या डीसीएचसी संख्या बेड संख्या

अकोले ०९ ५३० ०२

जामखेड ०१ ३०० ०५

कर्जत ०२ २८० ०१

कोपरगाव ०३ ६१० ०७

नगर ग्रामीण ०५ ४२० ०५

नेवासा ०१ २५० ०२

पारनेर ०२ १६०० ०३

पाथर्डी ०५ ७०० ०१

राहाता ०८ ६६१ ०७

राहुरी ०१ ४०० ०६

संगमनेर १४ ९५९ २९

शेवगाव ०२ १५० ०१

श्रीगोंदा ०३ १९० ०६

श्रीरामपूर ०३ ५०० १०

शहरी भाग १६ १५८०

एकूण ६५ ९१३०

-----------------------

ग्रामीण रुग्णालये

एकूण रुग्णालये-१२

एकूण बेड-३३१७

आयसोलेशन बेड-११७२

आयसीयू बेड-४९३

ऑक्सिजन बेड-१४१२

व्हेंटिलेटर बेड-८२

---------------

अहमदनगर शहर

कोविड हॉस्पिटल-३१

एकूण बेड-१०२२

आयसीयू बेड-३६४

ऑक्सिजन बेड-५३२

व्हेंटिलेटर बेड-१२६

---------------------

Web Title: Sixteen thousand beds ready

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.