जिल्ह्यात रोजगार हमीवर वाढले सहा हजार मजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:22 IST2021-01-03T04:22:18+5:302021-01-03T04:22:18+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : कोरोनाच्या काळात ३ ते ५ हजार मजूर कामावर होते. अनलॉक झाल्यानंतर ही संख्या सहा ...

जिल्ह्यात रोजगार हमीवर वाढले सहा हजार मजूर
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : कोरोनाच्या काळात ३ ते ५ हजार मजूर कामावर होते. अनलॉक झाल्यानंतर ही संख्या सहा हजारांपर्यंत गेली होती. डिसेंबरअखेर मात्र ही संख्या सहा हजारांनी वाढली आहे. सध्या रोजगार हमीच्या कामांवर १२ हजार २१३ इतके मजूर काम करीत आहेत. वैयक्तिक लाभाच्या योजनेतील फळबागांच्या कामासाठी सर्वाधिक मजूर काम करीत आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव आणि पावसाळा एकाच कालावधीत असल्याने रोजगार हमीच्या कामांवर मजुरांची उपस्थिती कमी होती. ३ ते ५ हजार मजुरांचीच हजेरी असायची. ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होता. सप्टेंबर- ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ५ ते ६ हजार अशीच मजुरांची उपस्थिती होती. डिसेंबरमध्ये मात्र मजुरांच्या उपस्थितीमध्ये वाढ झाली आहे.
शिवारफेरीद्वारे गावागावांमध्ये कोणत्या कामांची सर्वाधिक गरज आहे, याची पाहणी झाली. त्यानुसार आगामी आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार केले जाणार आहे. यंदा मात्र सामुदायिक विकास कामांपेक्षा फळबागांच्या लागवडीवर भर दिला आहे. वैयक्तिक लाभाच्या योजनांमधून ही कामे सुरू आहेत. या फळबागा लावण्यासाठी मजुरांची मोठी गरज असल्याने सर्वाधिक संख्येने मजूर याच कामावर आहेत.
-------------------
पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कामे
ग्रामपंचायतींतर्गत होणारी कामे श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक आहेत, तर विविध यंत्रणेमार्फत होणारी पाथर्डी तालुक्यात सर्वाधिक कामे आहेत. कमी कामे असूनही कर्जत तालुक्यात सर्वाधिक २ हजार मजूर कामे करीत असल्याचे दिसते. कर्जत तालुक्यासोबत पारनेर, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड या तालुक्यांतही मजुरांची उपस्थिती मोठ्या प्रमाणावर आहे.
---
तालुकानिहाय स्थिती
तालुका कामांची संख्या मजुरांची संख्या
अकोले १४३ ५२६
जामखेड ३३५ ९८५
कर्जत २२९ २००१
कोपरगाव १४७ ३४९
नगर २६१ १३०७
नेवासा १५२ ६९६
पारनेर १३७ १०९२
पाथर्डी ३४४ १३५९
-----------------
सध्या वैयक्तिक लाभाच्या योजनांवर भर आहे. फळबागा तयार करण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. तिथे मजुरांची उपस्थिती चांगली आहे. अनलॉकनंतर जिल्ह्यात मजुरांची संख्या वाढली आहे. सहा ते सात हजार मजूर कामावर वाढले आहेत. रोजगार हमीवर काम करणारे मजूर हे जिल्ह्यातीलच आहेत. जिल्ह्यात परप्रांतामधून मजूर आलेले नाहीत.
-उदय किसवे, उपजिल्हाधिकारी (रोहयो)
---
फाइल फोटो
राहाता १२३ ३२१
राहुरी ५३ २३९
शेवगाव १८३ १२४८
श्रीगोंदा २६४ १०८०
श्रीरामपूर ५१ २९०
-------------------------
एकूण २५३२ १२२१३