डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण
By Admin | Updated: October 13, 2024 09:12 IST2014-09-18T23:16:29+5:302024-10-13T09:12:32+5:30
अहमदनगर: मलेरिया, कावीळ त्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरण्यास सुरूवात झाली आहे. नगर शहरात एक तर जिल्ह्यात पाच डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळून आले आहे.

डेंग्यूचे सहा संशयित रुग्ण
अहमदनगर: मलेरिया, कावीळ त्यानंतर डेंग्यूची साथ शहरात पसरण्यास सुरूवात झाली आहे. नगर शहरात एक तर जिल्ह्यात पाच डेंग्यूचे संशियत रुग्ण आढळून आले आहे. खासगी रुग्णालयातील अहवालानंतर खातरजमा करण्यासाठी संशयितांचे रक्त नमुने पुण्यातील शासकीय लॅबकडे पाठविण्यात आले आहेत.
नगर शहरातील माळीवाडा, बुऱ्हाणनगर, शेवगाव व पाथर्डी तालुक्यातील हे संशयित असल्याचे सूत्रांनी सांगितले. गत महिन्यातही डेंग्यूचे सात संशयित रुग्ण आढळून आले होते. पण तपासणीनंतर त्यांना डेंग्यू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेने सुटकेचा नि:श्वास सोडला. त्यानंतर शहरात कावीळ व मलेरियाची साथ पसरली. काविळीची साथ आता कुठेतरी अटोक्यात येत असतानाच डेंग्यूचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे. माळीवाड्यात डेंग्यूचा संशयित रुग्ण आढळून आला आहे. नगर शहरापासून जवळच असलेल्या बुऱ्हाणनगरलाही डेंग्यूची साथ पोहचली आहे.
नगर शहरात गुरूवारपर्यंत ५९ हजार घरांचा सर्व्हे केला. गुरूवारी १ हजार ३०० घरे तपासण्यात आली. त्यात ३ काविळीचे रुग्ण आढळून आले. कावीळग्रस्त रुग्णांची संख्या आता कमी होत असून साथ आटोक्यात आल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. (प्रतिनिधी)