कोपरगावात रविवारी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2020 15:30 IST2020-11-01T15:29:49+5:302020-11-01T15:30:33+5:30
कोपरगावात रविवारी (दि.१ नोव्हेंबर) रॅपिड अॅण्टिजेन किटद्वारे ११व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ व्यक्ती बाधित आढळला आहे. तर १० व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत.

कोपरगावात रविवारी सहा कोरोनाबाधित रुग्ण आढळले
क परगाव : कोपरगावात रविवारी (दि.१ नोव्हेंबर) रॅपिड अॅण्टिजेन किटद्वारे ११व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये १ व्यक्ती बाधित आढळला आहे. तर १० व्यक्ती निगेटिव्ह आल्या आहेत. खासगी लॅब २, नगर येथील अहवालात ३ अशा एकूण ६ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्या आहेत. ४ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे. १ नोव्हेंबर अखेर २१६३ कोरोनाची लागण झाली. त्यात ३७ जणांचा मृत्यु झाला आहे. तर सद्या ३४ बाधीत व्यक्तींवर सध्या उपचार सुरू आहे. उर्वरित २०९२ बाधीत व्यक्ती कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत तालुक्यातील १२ हजार ४०० व्यक्तींची कोरोनाची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १ हजार ९४४ व्यक्तीची नगर येथे स्त्राव पाठवून तर १० हजार ४५६ व्यक्तींची रॅपिड अॅण्टिजेन किटद्वारे तपासणी केली आहे.