अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा, २ बालकांची प्रकृती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2017 12:50 IST2017-05-25T12:50:25+5:302017-05-25T12:50:25+5:30

अकोले शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी रात्री धुमाकूळ घालीत सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली़

Six dogs of Akoleat bite, six of them have serious health | अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा, २ बालकांची प्रकृती गंभीर

अकोलेत पिसाळलेल्या कुत्र्याचा सहा जणांना चावा, २ बालकांची प्रकृती गंभीर

आॅनलाईन लोकमत
अकोले, दि़ २५ - अकोले शहरात पिसाळलेल्या कुत्र्याने बुधवारी रात्री धुमाकूळ घालीत सहा जणांना चावा घेतल्याची घटना घडली़ यात पाच बालकांचा समावेश असून, दोन बालकांची प्रकृती गंभीर आहे़
अकोले शहरातील ईस्लाम पेठेत एका पिसाळलेल्या कुत्र्याने सहा जणांना चावा घेतला़ यात एका परप्रांतीय कामगारासह पाच बालकांना या कुत्र्याने चावा घेतला आहे़ त्यांना उपचारासाठी अकोले ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले़ मात्र, रुग्णालयात श्वान दंश प्रतिबंधक लस उपलब्ध नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला़ तर यातील गंभीर जखमी झालेले हुजैफ जहीर शेख (वय ४) याच्या डोके, खांदा व बगलेत चावा घेतला़ तर हुजैफ फिरोज शेख (वय ३) यांच्या तोंडाला चावा घेतला़ त्यामुळे हे दोघेही गंभीर जखमी झाले़ त्यांना नाशिकच्या रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे़

Web Title: Six dogs of Akoleat bite, six of them have serious health