शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

श्रीरामपूरच्या अशोक कारखान्याचे सहा संचालक अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 19:03 IST

सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बबनराव मुठे यांचाही समावेश आहे. अपात्रतेमुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना हा धक्का मानला जातो.

ठळक मुद्देप्रादेशिक साखर सहसंचालकांचा आदेश

अहमदनगर : सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याच्या कारणावरून श्रीरामपूरच्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या सहा संचालकांना अहमदनगरच्या प्रादेशिक साखर सहसंचालक संगीता डोंगरे यांनी मंगळवारी अपात्र ठरविले. यात कारखान्याचे माजी अध्यक्ष गलांडे, थोरात व शिंदे यांच्यासह भाजपचे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य बबनराव मुठे यांचाही समावेश आहे. अपात्रतेमुळे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांना हा धक्का मानला जातो.शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, अनिल औताडे, युवराज जगताप, सुरेश ताके, निवृत्ती पवार, बबनराव उघडे, दिलीप गलांडे, काँग्रेसचे राजेंद्र पाऊलबुद्धे, ईश्वर दरंदले, भरत आसने, भाजपचे अनिल भनगडे, राम पटारे, ज्ञानदेव थोरात यांनी याबाबत तक्रार केली होती.२ फेब्रुवारी २०१८ रोजी याबाबत साखर सहसंचालकांकडे तक्रार केली होती. त्यानुसार सुरेश गलांडे, रावसाहेब थोरात, आबासाहेब गवारे, बबनराव मुठे, दिगंबर शिंदे, मंगला पवार, पुंजाहरी शिंदे, भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बापू त्रिभुवन, पोपटराव जाधव हे अकरा संचालक त्यांच्या गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे थकबाकीदार असल्याचे व राज्य सरकारच्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ मध्ये कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी अर्ज केलेला असल्याने ते थकबाकीदार ठरतात. त्यामुळे सहकारी कायद्यातील तरतुदीनुसार संचालक म्हणून राहण्यास अपात्र आहेत. त्यामुळे त्यांचे संचालक पद रद्द करावे, अशी तक्रार करण्यात आली होती. त्यासोबत तक्रारदारांनी या संचालकांच्या थकबाकीची कागदपत्रे पुराव्यादाखल सादर केली होती.या तक्रारीची दखल घेऊन प्रादेशिक सहसंचालक डोंगरे यांनी संबंधित संचालकांना म्हणणे मांडण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावल्या होत्या. त्यानुसार या संचालकांनी सहसंचालकांसमोर आपले लेखी म्हणणे सादर केले होते. या प्रकरणाची अंतिम सुनावणी मंगळवारी होऊन सहसंचालक डोंगरे यांनी सहा संचालकांना अपात्र ठरविणारा आदेश दिला.हे संचालक ठरले अपात्रसुरेश गलांडे, रावसाहेब थोरात, आबासाहेब गवारे, बबनराव मुठे, दिगंबर शिंदे, सुलोचना पवार.हे संचालक ठरले पात्रपुंजा हरी शिंदे, भाऊसाहेब कहांडळ, दत्तात्रय नाईक, बापू त्रिभुवन, पोपटराव जाधवअसा आहे आदेशमहाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७८ (ए) (१) (बी) नुसार अपात्रता धारणा करीत असल्यामुळे या सहा जणांंना संचालक पदावरून कमी करण्यात येत आहे.-संगीता डोंगरे, प्रादेशिक सहसंचालक (साखर), तथा सहनिबंधक, सहकारी संस्था, अहमदनगर.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrirampurश्रीरामपूर