जिल्ह्यातील सव्वासहा लाख विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:22 IST2021-04-04T04:22:12+5:302021-04-04T04:22:12+5:30

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली. ...

Six and a half lakh students from the district will go to the next class | जिल्ह्यातील सव्वासहा लाख विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

जिल्ह्यातील सव्वासहा लाख विद्यार्थी जाणार पुढच्या वर्गात

अहमदनगर : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्र्यांनी केली. त्याअनुषंगाने नगर जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे एकूण ६ लाख २१ हजार विद्यार्थी पुढील वर्गात जाणार आहेत.

राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी कोणतीही परीक्षा न होता पुढच्या वर्गात प्रवेशित होतील, असा महत्त्वपूर्ण निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी घेतला.

दरम्यान, नगर जिल्ह्यात २०१९-२० च्या पटसंख्येनुसार सर्व व्यवस्थापनाच्या ५ हजार ३७६ शाळा असून, यात पहिली ते आठवीचे ३ लाख ३६ हजार ७४६ मुले आणि २ लाख ८४ हजार ९३३ मुली आहेत. हे सर्व ६ लाख २१ हजार ६७९ विद्यार्थी कोणतेही परीक्षा न होता पुढील वर्गात प्रवेशित होणार आहेत.

------------

पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या

अकोले - ३६ हजार ५९१

राहाता - ४६ हजार ४६८

राहुरी - ४४ हजार ८५२

संगमनेर - ६३ हजार ७७०

शेवगाव - ३५ हजार ५०४

श्रीगोंदा - ३७ हजार ६९५

श्रीरामपूर - ३९ हजार ३८८

जामेखड - २० हजार ९००

कर्जत - २९ हजार ३७१

कोपरगाव - ४६ हजार ९५४

नगर - ४६ हजार २९७

नेवासा - ५२ हजार १८८

पारनेर - ३४ हजार ३६७

पाथर्डी - ३४ हजार ४४४ महापालिका - ५२ हजार ८९०

Web Title: Six and a half lakh students from the district will go to the next class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.