सहा आरोपी फरार
By Admin | Updated: September 19, 2014 23:40 IST2014-09-19T23:29:22+5:302014-09-19T23:40:49+5:30
तळेगाव दिघे : जनावरांचे मांस घेवून जाणारा मालवाहू ट्रक पेटवून पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी तळेगाव दिघे व चिंचोली गुरवमधील एकुण ३२ तरूणांविरूध्द गुन्हा दाखल केला.

सहा आरोपी फरार
तळेगाव दिघे : जनावरांचे मांस घेवून जाणारा मालवाहू ट्रक पेटवून पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केल्याप्रकरणी तळेगाव दिघे व चिंचोली गुरवमधील एकुण ३२ तरूणांविरूध्द तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यापैकी अटकेत असलेल्या २४ जणांना शुक्रवारी न्यायालयीन कोठडी मिळाली.
पोलिसांची माहीती अशी, सोमवारी सायंकाळी मालवाहू ट्रक(क्रमांक एम.एच.४१, जे.७२०६) मधून नांदुर शिंगोटे- तळेगाव दिघे रस्त्यावरून जनावरांचे मांस नेले जात असल्याचे काही तरूणांना समजले. या तरूणांनी सदर ट्रक तळेगावनजीक अडवून पेटवून दिला. तसेच पोलिस व अग्नीशामक दलाच्या वाहनांवर दगडफेक केली.
याप्रकरणी तालुका पोलिसांनी दिलीप दिघे, विकास दिघे, दीपक भागवत, निलेश दिघे, रामनाथ भागवत, प्रशांत क्षीरसागर, गोविंद दिघे, नवनाथ रहाणे आदींसह एकुण ३२जणांविरूध्द दंगल, मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करून २४ जणांना अटक केली. तर रोहीत शिंदे, विजय शिंदे, मच्छिंद्र दिघे, संजय कवाडे, पंढरीनाथ इल्हे, सचीन दिघे असे ६ आरोपी फरार झाल्याने त्यांचा शोध पोलिस घेत आहेत. आज दुपारी अटकेतील २४ आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
(वार्ताहर)