आता तरी घरी बसा..... अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवसात सर्वाधिक 3097 रुग्ण कोरोनाबाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 14:58 IST2021-04-15T14:12:23+5:302021-04-15T14:58:30+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात आज कोरोनाची सर्वोच्च रुग्ण संख्या आढळून आली. जिल्ह्यात 24 तासात 3097 रुग्ण, तर नगर शहरात 675 रुग्ण आढळून आले.

आता तरी घरी बसा..... अहमदनगर जिल्ह्यात आज एकाच दिवसात सर्वाधिक 3097 रुग्ण कोरोनाबाधित
अहमदनगर : जिल्ह्यात आज कोरोनाची सर्वोच्च रुग्ण संख्या आढळून आली. जिल्ह्यात 24 तासात 3097 रुग्ण, तर नगर शहरात 675 रुग्ण आढळून आले.
जिल्ह्यात रोज सरासरी दोन हजार रुग्ण आढळून येत आहेत. मात्र आज तब्बल तीन हजार जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॅझिटिव्ह आले आहेत.
नगर शहरात सर्वाधिक 675 जणांचा अहवाल पॅझिटिव्ह आला. त्या खालोखाल राहाता तालुक्यात 352, संगमनेर तालुक्यात 267, पाथर्डी तालुक्यात 195, कर्जत तालुक्यात 190, कोपरगाव तालुक्यात 177 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॅझिटिव्ह आला आहे.