लैंगिक शोषणप्रकरणी एकास सश्रम कारावास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2016 23:57 IST2016-05-12T23:54:20+5:302016-05-12T23:57:23+5:30
नेवासा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नेवासा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सुनावली.

लैंगिक शोषणप्रकरणी एकास सश्रम कारावास
नेवासा : अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एकास तीन वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा नेवासा जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश सत्यनारायण नावंदर यांनी सुनावली. अत्याचार व मारहाण केल्याप्रकरणी सहा-सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षाही ठोठावली आहे. या सर्व शिक्षा एकाच वेळी भोगायच्या असून, दंडाची एकूण रक्कम २० हजार रुपये पीडित मुलीला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे़
३ जून १५ रोजी नेवासा तालुक्यातील महालक्ष्मी हिवरे येथील दोन अल्पवयीन मुली गवत घेत असताना आरोपी बाळासाहेब गायके याने एका मुलीला पकडून तिच्याशी लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले़ याबाबत पीडित मुलीने तिच्या आजीला घडलेला प्रकार सांगितला़ त्यानंतर आजीने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दिली़ पोलिसांनी नेवासा न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोप पत्र दाखल केले होते़
परिस्थितीजन्य पुरावा व साक्षीदारांचे साक्षी, जबाबावरून आरोपी विरुद्ध बालकांचे लैंगिक शोषणचा गुन्हा सिद्ध झाला. त्यामुळे आरोपीस ३ वर्ष सक्त मजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली.
आरोपीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा सिद्ध झाला़ मात्र, पीडित मुलगी ही बालक असल्यामुळे आरोपीची शिक्षा ही बाललैगिंक कायद्याच्या शिक्षेत समाविष्ट करण्यात आली. लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व रुपये ५ हजार दंड ठोठवण्यात आला़ पीडित मुलीस मारहाण व शिविगाळ केल्याप्रकरणी आरोपीस सहा महिने सक्त मजुरी व ५ हजार रुपये दंड ठोठावण्यात आला. वरील सर्व शिक्षा एकाच वेळी भोगावयाच्या आहे. दंडाची एकूण होणारी रक्कम रुपये २० हजार पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्याचे आदेश न्या. नावंदर यांनी दिले आहे. फिर्यादीतर्फे सरकारी वकिल अॅड. प्रमोद बलटे, अॅड. बी. एल. तांबे, अॅड. ए. जी. रोकडे यांनी काम पाहिले.
(तालुका प्रतिनिधी)