उलगडल्या नात्यातल्या रेशीमगाठी!
By Admin | Updated: July 1, 2014 00:15 IST2014-06-30T23:29:14+5:302014-07-01T00:15:57+5:30
अहमदनगर : नाते कोनतेही असो, पण ते टिकविण्यासाठी पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वीकारल्यास जीवनातील समस्या दूर होतात
उलगडल्या नात्यातल्या रेशीमगाठी!
अहमदनगर : नाते कोनतेही असो, पण ते टिकविण्यासाठी पारदर्शकता असणे खूप महत्त्वाचे असते. प्रत्येकाने आपण जसे आहोत तसे स्वीकारल्यास जीवनातील समस्या दूर होतात, असे प्रतिपादन प्रसिद्ध अभिनेत्री ऋजुता देशमुख यांनी केले.
लोकमत सखी मंच आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत व पॉवर्ड बाय साईदिप ग्रुप, ‘‘सासू-सून जोडी नं. १’’ या कार्यक्रमाच्या वेळी त्या बोलत होत्या. सासू-सून संमेलनाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी व्यासपीठावर लोकमतचे सरव्यवस्थापक शिरीष बंगाळे, वामन हरी पेठे ज्वेलर्सचे आशुतोष दाबके, माधुरी घाटगे, साईदीप ग्रुपच्या आशा बोरा, मोनाली बोरा, अभिनेत्री ऋजुता देशमुख आदी उपस्थित होते.
संमेलनात प्रथम परिचय फेरी घेण्यात आली. यात सासूने सुनेचा तर सुनेने सासूचा परिचय करून द्यायचा होता. या फेरीत एकूण ३३ सासू-सुनांनी सहभाग नोंदवला. प्रत्येक स्पर्धकाने आपल्या अनोख्या शैलीत परिचय करून दिला. यावेळी सासू-सुनेचे नाते आई-मुली सारखे, तर काही घरात मैत्रींनीसारखे असल्याचे दिसून आले. साठ वर्षांच्या सासूबाई केवळ आपल्या आग्रहाखातर स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी तयार झाल्या असेही यावेळी सांगण्यात आले. काहींनी तर सासू-सुनेच्या नात्यावर कविताही सादर केल्या.
परिचय फेरीमध्ये सहभागी सासू-सुनांची पुढील फेरीसाठी निवड करण्यात आली. या फेरीमध्ये निवडक सासू-सुनांनाच सहभागी होण्याचा आनंद घेता आला. या स्पर्धेमध्ये फनी गेम्स घेण्यात आले.
या गेमचा आनंद स्पर्धकांबरोबरच उपस्थित सखींनीही घेतला. या फेरीनंतर अभिनेत्री ऋजुता देशमुख यांच्याशी उपस्थित सखींनी संवाद साधला. कार्यक्रमास उपस्थित सखींचा प्रतिसाद बघून अभिनेत्री ऋजुता देशमुख यांना अहमदनगरला आल्याचा आनंद वाटल्याचे त्यांनी नमूद केले. आर.जे. प्रभू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वृषाली साळी, मोनिका संकलेचा, अमल ससे, सुवर्णा बंबोरी या सखींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)
लकी ड्रॉ विजेत्या
सोनल सुराणा
विजया राव
सविता ढोले
सासू-सून जोडी नं.१ विजेत्या
रत्ना व तारा नवसुपे- प्रथम
सुवर्णा व प्रतिभा सासवडे - द्वितीय
अर्चना व अरुणा पवार- तृतीय
प्रसन्ना व मंगला चोपडा -उत्तेजनार्थ
समीक्षा व पुष्पा वायकर- उत्तेजनार्थ