मोहरमची मिरवणूक शांततेत

By Admin | Updated: October 13, 2016 00:59 IST2016-10-13T00:26:07+5:302016-10-13T00:59:38+5:30

अहमदनगर : देशभरात प्रसिद्ध असलेल्या येथील मोहरमची सवारी विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत पार पडली. दुपारी तीन वाजता इमाम हुसेन यांची सवारी कोठला येथून बाहेर निघाली

Silence procession in peace | मोहरमची मिरवणूक शांततेत

मोहरमची मिरवणूक शांततेत


अहमदनगर : देशभरात प्रसिद्ध असलेल्या येथील मोहरमची सवारी विसर्जन मिरवणूक मंगळवारी शांततेत पार पडली.
दुपारी तीन वाजता इमाम हुसेन यांची सवारी कोठला येथून बाहेर निघाली. नंतर ती हवेलीत पोहोचली. तेथे इमाम हसन यांच्या सवारीशी तिची भेट झाली. तेथून मोहरमच्या मुख्य मिरवणुकीला प्रारंभ झाला़ मिरवणुकीत सर्वधर्मियांनी सहभाग घेत सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवले.
या़़ हुसेऩ़़या़़़हुसेनच्या जयघोषात निघालेल्या सवारींना खांदा देण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती़ इमामे हुसेन (छोटे बारे इमाम) व मंगलगेट हवेली येथील इमामे हसन (मोठे बारे इमाम) या दोन सवारी मिरवणुकींना मोठा इतिहास आहे़ हा सोहळा पाहण्यासाठी शहरवासीयांनी मोठी गर्दी केली होती़ मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना शहरात विविध ठिकाणी सरबतांचे वाटप करण्यात आले़ कोठला, दाळमंडई, पिंजार गल्ली, मोची गल्ली, बांबू गल्ली, जुनाबाजार, पंचपीर चावडी, जुनी महानगरपालिका, सबजेल चौक, चौपाटी कारंजा ते दिल्ली गेट व तेथून बालिकाश्रम रोडमार्गे सावेडी गावठाण येथे सवारींचे विसर्जन करण्यात आले़ दरम्यान कोठला येथून सवारी निघण्यास विलंब झाल्याने मिरवणूक मार्गावर छोटे बारे इमाम यांची सवारी रेंगाळली़
पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करणे गरजेचे होते़ सवारी चौपाटी करंजा येथे आल्यानंतर पोलिसांनी सवारी पुढे नेण्यासाठी आग्रह धरल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली़ रात्री साडेनऊ वाजेनंतर सवारी दिल्लीगेटमधून बाहेर पडली़ मोठे बारे इमाम व छोटे बारे इमाम यांच्या सवारीत मोठे अंतर पडले होते़
सवारी दिल्ली गेट येथे आल्यानंतर दर्शनासाठी सर्वधर्मियांनी मोठी गर्दी केली होती़ येथे गर्दी वाढू लागल्याने पोलिसांनी हस्तक्षेप करत सवारी पुढे काढली़ यावेळी उपस्थितांची चांगलीच धावपळ झाली़ या हुसेऩ़़या हुसेनच्या जयघोषाने यावेळी परिसर दुमदुमून गेला होता़ रात्री उशीरा या सवाऱ्यांचे सावेडी गावठाण येथे विसर्जन करण्यात आले़ (प्रतिनिधी)
छोटे बारे इमाम यांची सवारी पंचपीर चावडी येथे आली, तेव्हा मोठी गर्दी झाली होती़ मिरवणूक मार्गावर सवारींना ठिकठिकाणी फुलांनी सजविलेल्या चादर अर्पण करण्यात आल्या़ कोठला येथून मिरवणूक निघण्यास दुपारी विलंब झाल्याने रात्री साडेआठ वाजता मोठे बारे इमाम यांची दिल्ली गेट, तर छोटे बारे इमाम यांची पंचपीर चावडी येथे मिरवणूक रेंगाळली होती़
चौकाचौकांत पोलीस
मोहरम मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता़ मिरवणुकीचे ज्या मार्गावरून प्रस्थान होणार आहे, त्या मार्गावर प्रत्येक चौकात बॅरिगेटस् लावून कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ पोलीस उपाधीक्षक आनंद भोईटे, चिन्मय पंडित हे स्वत: मिरवणुकीबरोबर होते़
सवारींसमोर मोर्चनचे आकर्षण
सवारी मिरवणुकीसमोर मोरांच्या पिसापासून बनविलेले उंच़़उंच मोर्चन उपस्थितांसाठी आकर्षण ठरले़ बांबूंच्या टोकाला कलात्मक पद्धतीने मोरांचे पिसे जोडून त्याला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेले मोर्चन मिरवणुकीत लांबवरून दिसत होते़

Web Title: Silence procession in peace

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.