सिध्दी नदीचे पाणी दूषित
By Admin | Updated: September 25, 2014 00:51 IST2014-09-24T23:50:36+5:302014-09-25T00:51:36+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील सिद्धी नदीत अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन टाकल्याने नदीचे पाणी दृूषित झाले आहे.

सिध्दी नदीचे पाणी दूषित
श्रीगोंदा : तालुक्यातील देवदैठण येथील सिद्धी नदीत अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन टाकल्याने नदीचे पाणी दृूषित झाले आहे. या रसायनामुळे अनेक मासे व इतर जलचर प्राणी मृत्युमुखी पडले आहेत. या घटनेमुळे देवदैठणची पाणी योजना बंद करण्यात आली आहे.
पाण्याच्या रंगात बदल
याबाबत समजलेली माहिती अशी, २३ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने विषारी रसायन या सिद्धी नदीच्या पाण्यात टाकले. त्यामुळे नदीतील पाणी दूषित झाले असून पाण्याचा रंग बदलला आहे.
नागरिकांमध्ये घबराट
सकाळी रसायनयुक्त दूषित पाणी नळ पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीत उतरले. त्यामुळे नळाला दूषित पाणी आल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामपंचायतीने तातडीने पाणीपुरवठा बंद केला.
आरोग्याला धोका
विषारी रसायनमुळे नदीतील अनेक मासे जलचर प्राणी, किटक, जलदर पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. दूषित पाण्याची सर्वत्र दुर्गंधी पसरल्याने आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. नदीत विषारीे रसायन टाकणाऱ्याचा शोध घेण्याची मागणी होत आहे.
(तालुका प्रतिनिधी)