सिद्धार्थनगर आणि तोफखाना कन्टेंटमेंट झोन जाहीर, शहरातील भाजीविक्रेत्यांनाही हटविले, शहरात सकाळपासून शुकशुकाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 12:56 IST2020-06-25T12:55:52+5:302020-06-25T12:56:08+5:30
अहमदनगर : तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळ््याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत. दरम्यान शहरातील भाजीवाल्यांना आज सकाळीच उठवण्यात आले. तसेच काही भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.

सिद्धार्थनगर आणि तोफखाना कन्टेंटमेंट झोन जाहीर, शहरातील भाजीविक्रेत्यांनाही हटविले, शहरात सकाळपासून शुकशुकाट
अहमदनगर : तोफखाना परिसर आणि सिद्धार्थनगर भागात सर्वाधिक रुग्ण आढळ््याने महापालिकेने दोन्ही परिसर १० जुलैपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहेत. या भागात पत्रेही लावण्यात आले आहेत. दरम्यान शहरातील भाजीवाल्यांना आज सकाळीच उठवण्यात आले. तसेच काही भागातील दुकानेही बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सकाळपासूनच शहरात शुकशुकाट होता.
सिद्धार्थनगरमध्ये चार आणि तोफखाना पपसिरात चार रुग्ण आढळून आले आहे. त्यामुळे हो दोन्ही परिसर लॉक करण्यात आले आहेत.
----------
सिद्धार्थनगर परिसर
सिद्धार्थनगर, सारडा कॉलेजची पाठीमागील बाजू, गोळीबार मैदान, दीपक मोहिते घर, गुरुकुल शिक्षण मंडळाच्या उत्तरेकडील बाजू, जाधव मळा, कवडे नगर, सारडा कॉलेज.
तोफखाना परिसर
सिद्धीबाग कोपरा, तोफखाना, शितळा देवी मंदिर, श्री. लयचेट्टी यांचे घर, बागडे ज्वेलर्स, चितळे रोड, नेहरू मार्केट, चौपाटी कारंजा, दिल्लीगेट, दत्त मंदिर ते सिद्धीबाग कोपरा