शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पाय घसरून पडल्याने भावंडांना जलसमाधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 12:06 IST

श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही. 

श्रीगोंदा : तालुक्यातील कोळगाव येथील लगडवाडी परिसरात विहिरीमध्ये पाय घसरून आविष्कार (वय ६), कार्तिक (वय ४) या दोन सख्या लहान भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी घडली. हा दुर्दैवी घटनेमुळे लगडवाडीत दिवाळी साजरी झाली नाही. 

   कोळगाव येथील लगडवाडी परिसरात राहणाऱ्या कांतीलाल सोनवणे यांची दोन लहान मुले आविष्कार सोनवणे व कार्तिक सोनवणे हे दोघे घराशेजारी असलेल्या  विहिरीजवळ खेळत असताना पाय पाय घसरून पडले. ते बराच वेळ आढळून न आल्याने सोनवणे परिवाराने आपल्या लेकरांची शोधमोहीम सुरू केली. यातील आविष्कार याचा मृतदेह पाण्यावरती तरंगताना घटना घडल्याचे कुटुंबीयांना सायंकाळी उशिरा लक्षात आले. 

  विहरीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने चार वर्षीय कार्तिक याचा मृतदेह सापडत नसल्याने मृतदेह शोधण्याचे काम स्थानिक तरुणांच्या मदतीने रात्री उशिरापर्यंत केले. शनिवारी रात्री दोन वाजता कार्तिकचा मृतदेह विहीरातून बाहेर काढण्यात आला. या चिमुकल्यांचे मृतदेह पाहून आई-वडीलांनी हंबरडाच फोडला.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरShrigondaश्रीगोंदाAccidentअपघातDeathमृत्यू