प्रमोद आहेरशिर्डी : आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे. जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे.धर्म, जात, देश अशी सर्व बंधने तोडून या सर्वांना साईनामाच्या धाग्याने एकत्र जोडले आहे. जर्मनीच्या रिनेक शहरातील श्रीसाई आश्रमाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. मूळचे हैदराबाद येथील असलेले साई रेड्डी चोलेटी यांनी १९९३ मध्ये जर्मनीत साईबाबांच्या नावाने योगा केंद्र सुरू केले. दीडशे केंद्रांच्या रूपाने जर्मनीत देशभर विस्तार झालेल्या या चळवळीत पस्तीस हजार लोक जोडले गेले आहेत. लोकसंख्येने कमी असलेल्या जर्मनीत ही संख्या खूप मोठी आहे. या केंद्रामध्ये साईबाबांची प्रतिमा असते. या प्रतिमेपुढे मेणबत्ती लावून साईनामाचा जप व भजन करण्यात येते. त्यानंतर ध्यानधारणा करण्यात येते. यात अनिवासीय भारतीयांची संख्या अगदी नगण्य असून स्थानिक जर्मन नागरिक अधिक आहेत.जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. तीनशे एकरवर जंगल आहे. येथे आता भव्य साई मंदिराचे निर्माण होत आहे़ यापूर्वी फ्रँकफुर्ट, लाईफसिक व हेस्टलो शहरात साईमंदिरे झाली आहेत. शनिवार, रविवार या मंदिरांमध्ये मोठ्या संख्येने भाविक येतात.साईरेड्डी गेल्या वीस वर्षांपासून तेथील भाविकांसह वर्षातून दोनदा शिर्डीला भेट देतात. याद्वारे दरवर्षी शिर्डीला किमान साठ ते सत्तर भाविक येतात. अलिकडे तेथून अन्य ग्रुपही शिर्डीला येत आहेत. दोन दिवसांपासून साई रेड्डी वीस भाविकांसह साईदरबारी आले आहेत. संस्थानचे जनसंपर्क अधिकारी मोहन यादव यांनी या सर्वांचे आदरतिथ्य करीत भारतीय पद्धतीने स्वागत केले.
जर्मनीत सहाशे एकर जागेत साईआश्रम; दिवसाची सुरूवात साईनामाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 18:38 IST
जर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे. आर्थिक व औद्योगिकदृष्ट्या प्रगत देश अशी जगभर ओळख असलेल्या जर्मनीतील जवळपास दीडशे शहरातील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे.
जर्मनीत सहाशे एकर जागेत साईआश्रम; दिवसाची सुरूवात साईनामाने
ठळक मुद्देजर्मनीतील श्रीसाईआश्रम सहाशे एकर जागेत आहे.जर्मनीतील हजारो नागरिकांच्या दिवसाची सुरूवात साईनामाने होत आहे.जर्मनीच्या रिनेक शहरातील श्रीसाई आश्रमाच्या माध्यमातून ही किमया साधली आहे. मूळचे हैदराबाद येथील असलेले साई रेड्डी चोलेटी यांनी १९९३ मध्ये जर्मनीत साईबाबांच्या नावाने योगा केंद्र सुरू केले.