अहमदनगर जिल्ह्यातील बंद स्थगित : महामार्ग खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 14:55 IST2018-07-25T14:55:03+5:302018-07-25T14:55:29+5:30
मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महामार्गावर रास्तारोको करुन आंदोलन स्थगित करण्यात आले.

अहमदनगर जिल्ह्यातील बंद स्थगित : महामार्ग खुले
अहमदनगर : मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलक तरुणाने गोदावरी नदीत उडी मारून आत्महत्या केल्याच्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे आज जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली आहे. त्यासाठी जिल्ह्यातील महामार्गावर रास्तारोको करुन आंदोलन स्थगित करण्यात आले.
अहमदनगर- मनमाड मार्गावर विळद घाट येथे, कल्याण - विशाखापट्टणम रोडवर कल्याण बायपासवर, औरंगाबाद- पुणे मार्गावरील केडगाव बायपासवर, अहमदनगर - दौंड मार्गावर अरणगाव येथे, अहमदनगर - सोलापूर मार्गावर वाळुंज बायपासवर, पाथर्डी रोडवर विजय लाईन येथे, औरंगाबाद मार्गावर शेंडी बायपासवर, बीड रोडवर निंबोडी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.