डोंगरगणच्या रामेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:36 IST2021-03-13T04:36:42+5:302021-03-13T04:36:42+5:30

पिंपळगाव माळवी : डोंगरगण (ता.नगर) येथे महाशिवरात्रीनिमित्त मंदिर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे रामेश्वर मंदिर परिसरात गुरुवारी ...

Shukshukat in the Rameshwar temple area of Dongargan | डोंगरगणच्या रामेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट

डोंगरगणच्या रामेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट

पिंपळगाव माळवी : डोंगरगण (ता.नगर) येथे महाशिवरात्रीनिमित्त मंदिर प्रशासनाने केलेल्या आवाहनाला भाविकांनी प्रतिसाद दिला. त्यामुळे रामेश्वर मंदिर परिसरात गुरुवारी शुकशुकाट पाहायला मिळाला. नगर शहरापासून वीस किलोमीटर अंतरावरील डोंगरगण येथील रामेश्वर मंदिर दरवर्षी महाशिवरात्रीला हजारो भाविकांनी गजबजून जाते, परंतु मागील वर्षापासून सुरू असलेल्या कोरोना प्रादुर्भावामुळे मंदिर काही दिवस बंद होते. कोरोना कमी झाल्यानंतर शासनाने मंदिरे खुली केली होती. जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने डोके वर काढल्यामुळे मंदिर परिसर यावर्षी बंद ठेवण्याचा निर्णय विश्वस्त मंडळाने घेतला आहे. त्यामुळे यावर्षी रामेश्वर मंदिर परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला.

डोंगरगणचा ‘आनंद दरी’ या नावाने ब्रिटिश गॅझिटिअरमध्ये त्याचा उल्लेख आहे. येथे पुरातन रामेश्वर मंदिर असून यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे सध्या परिसर हिरवागार असून दरीत पाणी उपलब्ध आहे, परंतु कोरोना प्रादुर्भाव वाढल्यामुळे प्रशासनाने पुन्हा काही निर्बंध घातले आहेत. त्यामुळे विश्वस्त मंडळाने यावर्षी मंदिर परिसर बंद ठेवला. त्यांच्या आवाहनाला भाविकांनीही प्रतिसाद दिला.

---

११ डोंगरगण

डोंगरगण येथील रामेश्वर मंदिर परिसरात दिवसभर शुकशुकाट होता.

Web Title: Shukshukat in the Rameshwar temple area of Dongargan