शेवगाव शहरातील कोविड सेंटरची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:26 IST2021-04-30T04:26:51+5:302021-04-30T04:26:51+5:30

शेवगाव : राज्यातील विविध शहरांत कोविड सेंटरमध्ये आग, ऑक्सिजनसंदर्भात घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगरपरिषदने शहरातील खासगी कोविड सेंटरची तपासणी ...

Shrubs of Kovid Center in Shevgaon city | शेवगाव शहरातील कोविड सेंटरची झाडाझडती

शेवगाव शहरातील कोविड सेंटरची झाडाझडती

शेवगाव : राज्यातील विविध शहरांत कोविड सेंटरमध्ये आग, ऑक्सिजनसंदर्भात घडलेल्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर शेवगाव नगरपरिषदने शहरातील खासगी कोविड सेंटरची तपासणी करून हॉस्पिटलमध्ये आढळून आलेल्या त्रुटी व करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात संबंधित हॉस्पिटल प्रशासनाला लेखी सूचना कळविल्या आहेत.

नगरपरिषदेचे प्रशासक तथा प्रांताधिकारी देवदत्त केकाण यांनी शहरातील सर्व कोविड सेंटरची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार शहरातील बडे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटल, श्री साई कोविड हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल येथे जाऊन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ, नितीन बनसोडे, सोमनाथ नारळकर, प्रशांत सोनटक्के आदींनी तपासणी केली. यावेळी पाहणीत त्यांना आढळून आलेल्या त्रुटीसंदर्भात हॉस्पिटल प्रशासनाला लेखी कळविले आहे. तसेच तत्काळ फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिट संबंधित अधिकृत एजन्सीमार्फत पाच दिवसांच्या आत करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नगरपरिषद पथकाने तपासणी करताना हॉस्पिटल इमारत सुस्थितीत आहे का? जनरल बेड व ऑक्सिजन बेडची संख्या किती? रिकामे व भरलेली ऑक्सिजन सिलिंडर संख्या, ऑक्सिजन स्टोअरेज टँक सिलिंडर, पाईपलाईन आदींची पाहणी करून अनुचित घटना घडणार नाही, याची दक्षता घ्यावी अशा सूचना यावेळी दिल्या आहेत.

Web Title: Shrubs of Kovid Center in Shevgaon city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.