श्रीरामपूरमध्ये दुकानाला आग
By Admin | Updated: August 24, 2014 02:05 IST2014-08-24T02:05:24+5:302014-08-24T02:05:49+5:30
श्रीरामपूर : येथील केशर प्रेम बिल्डींगमध्ये असलेल्या डंबीर अॅण्ड सन्स या भांडी दुकान व गोदामाला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले.

श्रीरामपूरमध्ये दुकानाला आग
श्रीरामपूर : येथील केशर प्रेम बिल्डींगमध्ये असलेल्या डंबीर अॅण्ड सन्स या भांडी दुकान व गोदामाला शुक्रवारी रात्री १० च्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागून मोठे नुकसान झाले.
डंबीर बंधू रात्री ९ वाजता दुकान बंद करून गेले. त्यानंतर दहाच्या सुमारास दुकानातुन धूर निघत असल्याचे वैभव लोढा व किरण पंखेवाले यांना दिसले. त्यांनी त्वरित याची माहिती डंबीर यांना दिली. त्यानंतर पालिकेची अग्नीशामक दलाची गाडी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी आले काही वेळातच अशोक कारखाना, राहुरी, नगरपालिका, औरंगाबाद येथूनही महापालिकेची आश्निशामक दलाची गाडी आली. सर्वांनी आग आटोक्यात आणण्यसाठी शर्तीचे प्रयत्न केले.
परंतु तोपर्यंत आगीत दुकानातील भांडी, सिगारेट, बिस्कीट, कॉस्मेटीक, स्प्रे, रंगाच्या गोण्या आदी साहित्य खाक झाले. यात दुकानाचे मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने इतर दुकानांना आगीची झळ लागली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर माजी आमदार जयंत ससाणे, आ. भाऊसाहेब कांबळे, सिध्दार्थ मुरकुटे आदींनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे, तहसीलदार किशोर कदम, मुख्याधिकारी संतोष खांडेकर यांनी पाहणी केली.
(वार्ताहर)