श्रीरामपुरात भरदिवसा घरफोडी : हजारोंचा माल लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 17:22 IST2018-10-16T17:22:06+5:302018-10-16T17:22:58+5:30
शहरातील प्रभाग एकमधील महात्मा फुले गृह निर्माण संस्थेतील डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाच्या तोडून चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजार व सोन्याची २२ हजार ५०० रुपये किमतीचे कर्णफुले चोरुन नेली आहेत.

श्रीरामपुरात भरदिवसा घरफोडी : हजारोंचा माल लंपास
श्रीरामपूर : शहरातील प्रभाग एकमधील महात्मा फुले गृह निर्माण संस्थेतील डॉ.श्रीकांत भालेराव यांच्या बंद बंगल्याच्या दरवाजाच्या तोडून चोरट्यांनी रोख रक्कम ४० हजार व सोन्याची २२ हजार ५०० रुपये किमतीचे कर्णफुले चोरुन नेली आहेत. ही घटना सोमवारी भरदिवसा घडली.
टाकळीभान येथे डॉ.भालेराव यांचा दवाखाना आहे. सोमवारी त्यांचा वाढदिवस रक्तदान शिबीरासाठी भालेराव कुटुंबीय बंगला बंद करुन टाकळीभान येथे गेले होते. बंगला बंद असल्याचे चोरट्यांनी हेरुन चोरीचा डाव साधला. चोरट्यांनी पहिल्या दरवाजाचा लॉक व दुसरे दरवाजे कुलुपे तोडून आत प्रवेश करुन ६२ हजार ५०० रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. दुसऱ्या दरवाजाची कडी लावून मागील दरवाजाने चोरटे पसार झाले. पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस पथकाने घराची पाहणी केली. नगर येथून तपासासाठी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ बोलावलि असता श्वानाने डॉ.गोंधळी हॉस्पीटलपर्यत माग दाखविला.