श्रीरामपुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह
By Admin | Updated: May 14, 2017 19:30 IST2017-05-14T19:28:50+5:302017-05-14T19:30:21+5:30
नगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगलकार्यालयात सर्वसर्वधर्मीय १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.

श्रीरामपुरात सर्वधर्मीय सामुदायिक विवाह
आॅनलाईन लोकमत
श्रीरामपूर (अहमदनगर), दि़ १४ - येथील हाजी दिलावरखान मशिदीच्या वतीने नगरपालिकेच्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी मंगलकार्यालयात सर्वसर्वधर्मीय १३ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात पार पडला.
सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी संयोजक पप्पू खान, सलिम दस्तगिर, अमिदभाई पटेल, सलीक याकुब खान यांचे बहुमोल सहकार्य लाभले. सामुदायिक विवाह सोहळ्यात कैलास राणू धोत्रे (देवळाली प्रवरा) व रश्मा अशोक लष्कर (नासिक), गणेश पांडुरंग मासाळकर (मिरजगांव) व अंजली दिलीप म्हस्के (भिंगार), सलिम सय्यद (बेलपिंपळगांव) व फातेमा चांद शाह (निपाणी वाडगांव), संतोष संजय म्हस्के (राहुरी खुर्द) व सुनिता कचरु धोत्रे (नासिक), सागर भिमा धोत्रे (नांदगांव) व रेखा रमेश म्हस्के (श्रीरामपूर), विजय सुरेश काकफडे (श्रीरामपूर) व कोमल जनार्दन औसरमल (वारी कान्हेगांव), विकास अशोक म्हस्के (पाथर्डी) व पुजा अनिल रोकडे (भिंगार), फिरोज उस्मान पठाण (हरेगांव) व रबिना अकिल पठाण (कळवण), सलमान शेरखान (श्रीरामपूर) व मुस्कान रशिद शेख (श्रीरामपूर) अल्ताफ आयुब सय्यद (नेवासा) व निलोफर शाह (वैजापूर), प्रदीप दिनकर पवार (गोंधवणी) व रुभा मच्छिंद्र बनसोडे (श्रीरामपूर) यांचे विवाह झाले.