श्रीरामपूर बाजार समितीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:40 IST2021-02-05T06:40:56+5:302021-02-05T06:40:56+5:30
श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात जुन्या उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. ढगाळ हवामानामुळे सड रोगाचा प्रादुर्भाव झाला ...

श्रीरामपूर बाजार समितीत
श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारात जुन्या उन्हाळी कांद्याची आवक वाढली आहे. ढगाळ हवामानामुळे सड रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे नवीन लाल कांद्याची आवक घटली आहे. शुक्रवारी झालेल्या कांद्याच्या लिलावामध्ये चांगल्या प्रतीच्या मालाला एक हजार ६०० ते दोन हजार ३०० रुपये भाव मिळाला. दुय्यम प्रतीच्या मालाला ९०० ते दीड हजार तर हलक्या प्रतीच्या मालाला ४०० ते ८५० रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला ९५० ते दीड हजार रुपये क्विंटलचा भाव मिळाला.
शेतकऱ्यांकडील उन्हाळी कांद्याचा साठा आता संपत आला आहे. नवीन कांदा बाजारात येण्यास अद्याप काही कालावधी आहे. बाजारात कांद्याची आवक कमी असल्यामुळे अन्य उलाढालींवर व बाजार समितीच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे.
-------------