श्रीरामपूर बाजार समितीत

By | Updated: December 5, 2020 04:35 IST2020-12-05T04:35:12+5:302020-12-05T04:35:12+5:30

श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा बाजारात दहा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या मालाला क्विंटलमागे ...

In Shrirampur Market Committee | श्रीरामपूर बाजार समितीत

श्रीरामपूर बाजार समितीत

श्रीरामपूर : येथील बाजार समितीच्या मुख्य आवारातील कांदा बाजारात दहा हजार कांदा गोण्यांची आवक झाली. चांगल्या प्रतीच्या मालाला क्विंटलमागे तीन हजार ६०० रुपये भाव मिळाला. समितीत झालेल्या लिलावामध्ये प्रथम प्रतीच्या कांद्यास २ हजार ६०० ते ३ हजार ६०० रुपये, दुय्यम मालास दीड ते अडीच हजार, हलक्या मालास पाचशे ते दीड हजार व गोल्टी कांद्याला दीड ते दोन हजार रुपये भाव मिळाला. टाकळीभान उपबाजारमध्ये १ डिसेंबर रोजी दीड हजार कांदा गोण्यांची आवक झाली. प्रथम प्रतीच्या मालास तिथे २ हजार ३०० ते ३ हजार ३००, दुय्यम प्रतीच्या मालाला १ हजार ३०० ते २ हजार २५०, हलक्या मालास ३०० ते दीड हजार, गोल्टी कांदा १ हजार ४०० ते २ हजार ३०० रुपये भाव मिळाला. मुख्य बाजारभावापेक्षा १०० ते २०० रुपये क्विंटलने भाव कमी निघाले.

Web Title: In Shrirampur Market Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.