या टीममध्ये कल्याण कुंकुलोळ, कामगार संघटनेचे जिल्हा सरचिटणीस जीवन सुरुडे, शंभरहून अधिक वेळा रक्तदान करणारे मनोज ओझा, राहुल सोनवणे, फिरोज पिंजारी, फिरोज दस्तगीर, शुभम् बिहाणी, केमिस्ट असोसिएशनचे सुजित राऊत, साजीद मिर्झा, सौरभ गदिया, कल्पेश चोरडिया, स्वप्नील सोनार, संजय वाघस्कर, ऋषिकेश बंड, नीलेश गोराणे, नजीर पिंजारी व विकी जैन यांचा समावेश आहे.
टीमने आतापर्यंत सुमारे २५ रुग्णांना प्लाझ्मा उपलब्ध करून दिला. शासकीय यंत्रणेमार्फत सुमारे २०० रुग्णांना रेमडेसिविर इंजेक्शन पुरविले, १५० रुग्णांना शहर, तालुका, अहमदनगर व जिल्ह्याबाहेर औरंगाबाद, नाशिक व पुणे येथील रुग्णालयात संपर्क साधून खाटा उपलब्ध करून दिल्या. ५० हून अधिक रुग्णांना रात्री-बेरात्री तात्काळ रुग्वाहिका उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे प्राण वाचले. वैयक्तिक खर्चातून अनेक रुग्णांना औषधांची मदत केली.
कुंकुलोळ हे अन्नदानाची जबाबदारी पार पाडतात. सध्या शहरातील ७० हून अधिक रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोफत दोन्ही वेळचे जेवण व पिण्याचे पाणी पोहोच करतात. कोविड रुग्णांना दवाखान्यात, सिटीस्कॅन, रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी आपल्या वाहनातून नेण्यास कोणीही धजावत नाही. मात्र, जीवन सुरुडे यांनी सलीम शेख या रिक्षाचालकास प्रोत्साहित केले. शेख आता अत्यल्प दरात हे काम अहोरात्र करीत आहेत.
----
तीन अंत्यविधी केले
शहरातील लक्ष्मीनगरमधील एक वृद्ध महिला व एका दाम्पत्याच्या मृत्यूनंतर नातेवाईक व आसपासचे नागरिक अंत्यविधी करण्यास धजावत नव्हते. केतन खोरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी स्वतः पुढाकार घेत नजीर पिंजारी, नीलेश गोराणे यांच्या मदतीने हे अंत्यविधी पार पाडले.