श्रीगोंदेकरांची ऑलिम्पिकवीराच्या आई-वडील, शिक्षकास सलामी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 04:09 IST2021-08-02T04:09:16+5:302021-08-02T04:09:16+5:30
श्रीगोंदा : श्रीगोंदा ते मांडवा (ता. आष्टी) ८० किमीची प्रेरणा सायकल वारी काढून मांडवा येथील ऑलिम्पिकवीर अविनाश साबळे ...

श्रीगोंदेकरांची ऑलिम्पिकवीराच्या आई-वडील, शिक्षकास सलामी
श्रीगोंदा : श्रीगोंदा ते मांडवा (ता. आष्टी) ८० किमीची प्रेरणा सायकल वारी काढून मांडवा येथील ऑलिम्पिकवीर अविनाश साबळे याचे आई-वडील, शिक्षकांना श्रीगोंदेकरांनी शनिवारी सलाम केला. अग्निपंख फाउंडेशनने हा उपक्रम राबविला.
यावेळी अविनाशचे आई-वडील व शिक्षक जमीर सय्यद यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
मांडवा येथील अविनाश साबळे हा वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका मजुराचा मुलगा आहे. त्याने टोकियो येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत तीन हजार ट्रीपल चेसमध्ये नॅशनल रेकॉर्ड केले. या खेळात पुरुष गटात अविनाशला भारताकडून ऑलिम्पिकमध्ये उतरण्याची संधी मिळाली.
श्रीगोंदा येथून निघालेल्या सायकल वारीस राष्ट्रीय मल्ल भाग्यश्री फंड, सोनाली मंडलिक, धनश्री फंड, पल्लवी पोटफोडे, सिद्धी शिंदे, साक्षी इंगळे यांनी प्रस्थान झेंडा दाखविला.
सायकल वारीचे श्रीगोंदा येथे नगरसेवक संग्राम घोडके, आढळगाव येथे सरपंच शिवप्रसाद उबाळे, शरद जमदाडे, रुईगव्हाण फाटा येथे प्रा. जामदार, चांदे येथे सतीश सुद्रिक महाराज, मिरजगाव येथे सरपंच यांनी स्वागत केले. आष्टी येथे पोलीस उपअधीक्षक विजय लगारे, ॲड. विजयराव ढोबळे यांनी स्वागत करून भोजनाची व्यवस्था केली. कडा येथे ए.के. शिंदे यांनी स्वागत केले. मांडवेचे सरपंच अशोक मुटकुले यांनी आभार मानले.
----
अविनाश लहानपणी शाळेत जाण्यासाठी धावत होता. त्याला खाण्यास सकस अन्न नव्हते. मात्र जिद्द होती. तो सैन्य दलात शिपाई म्हणून भरती झाला. आता टोकियो ऑलिम्पिकमध्येही धावला. त्याचा आम्हाला अभिमान वाटतो.
वैशाली व मुकुंद साबळे,
अविनाशचे आई-वडील
---
सहभागी सायकलपटू...
श्रावणी जगताप, ऋतुपर्ण साळवे, रोहित वऱ्हाडे, कृष्णा साळवे, वेदांत दरेकर, आदित्य वाजे, श्रीराम जगताप हे बालवीर तसेच
प्रतिभा गांधी, संगीता इंगळे, मनीषा काकडे, शहाजी खेतमाळीस, लालासाहेब काकडे, दत्ताजी जगताप, नवनाथ दरेकर, संपत इधाटे, मच्छिंद्र सुपेकर, तुषार शिंदे, महारुद्र तांबे, अमोल गव्हाणे, चंदन घोडके, अंकुश तुपे, अजय गाडेकर, अमोल साळवे, विजय पवार, श्रीयद सिद्धम.
----
०१ श्रीगोंदा सायकल
मांडवा येथे ऑलिम्पिकवीर अविनाश साबळेच्या आई-वडिलांचा श्रीगोंद्यातील सायकलपटूंनी सन्मान केला.