श्रीगोंद्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 18:21 IST2020-06-19T18:21:17+5:302020-06-19T18:21:45+5:30
श्रीगोंदा शहरातील साळवण देवी रोड परिसरात शुक्रवारी (दि.१९ जून) दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा परिसर सील करण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.

श्रीगोंद्यात दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले
श्रीगोंदा : शहरातील साळवण देवी रोड परिसरात शुक्रवारी (दि.१९ जून) दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हा परिसर सील करण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे.
श्रीगोंदा शहरातील १० जण राशीन येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आले होते. या दहा जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यापैकी एक पुरुष व एक महिला कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे, अशी माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी दिली.
साळवण देवीचा परिसर कॅन्टोन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. त्या परिसराला जोडणारे सर्व रोड बंद करण्यात करण्यात येणार आहेत, असे तहसीलदार माळी यांनी सांगितले.