श्रीगोंदा : वैद्यकीय क्षेत्राची कोणतीही पदवी नसताना भानगाव (ता.श्रीगोंदा) येथे दवाखाना थाटणारा गोपाळ बिस्वास (रा.पश्चिम बंगाल) या मुन्नाभाईला बुधवारी सकाळी १० वाजता श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. भानगाव येथे गोपाळ बिस्वास हा बोगस डॉक्टर आहे. तो मेडीकल क्षेत्रातील कोणतीही पदवी नसताना रुग्णांवर उपचार करीत आहे. यामध्ये एखाद्या रुग्णांचा बळी जाऊ शकतो अशी तक्रार तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.नितीन खामकर यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्याकडे केली होती. दौलतराव जाधव यांनी तात्काळ दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक सतीश गावीत यांना कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सतीश गावीत यांनी गोपाळ बिस्वास याला बुधवारी सकाळी अटक केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पश्चिम बंगालच्या मुन्नाभाईला ठोकल्या श्रीगोंदा पोलिसांनी बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2020 16:58 IST